स्वप्निलदादा शिंदे मित्र मंडळाच्या वतीने १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन मिळावा
अहमदनगर (प्रतिनिधी) – करिअर करताना विचारपूर्वक क्षेत्र निवडल्यास यशाची शिखरे गाठता येते. एकदा पुढे गेल्यावर मागे वळता येत नाही. यासाठी ध्येय स्पष्टपणे समोर ठेऊन युवक-युवतींनी वाटचाल करण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल शिंदे यांनी केले.
स्वप्निलदादा शिंदे मित्र मंडळाच्या वतीने कोठी परिसरातील १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी सिसल हँडी क्राफ्ट नगर पुणे रोड येथे करिअर मार्गदर्शनवर व्याख्यानाचे आयोजन करुन विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या या उपक्रमास महाविद्यालयीन मुले व युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाप्रसंगी मार्गदर्शक रेव्ह. प्रा. प्रतुल कसोटे व प्रयास काऊसलिग सेंटरचे डॉ शालिनी उजागरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल शिंदे समवेत सुधाकर अल्हाट, सूनीत ढगे, आकाश कोरे, वैभव पारधे, विशाल झेंडे, स्वयम साळवे, पोल थोरात, प्रेम बोर्डे, सृष्टी डोंगरे, शरोन कंगारे, ब्लेसी जाधव, अंजेल पाडळे, प्रिया गाडे, रिया लोखंडे, श्रद्धा राजपूत, अंबिका परलंके, प्रियंका पाडळे आदी उपस्थित होते.
पुढे सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल शिंदे म्हणाले की, महाविद्यालयीन शिक्षण घेताना करिअर निवडण्याचा विद्यार्थ्यांपुढे मोठा प्रश्न असतो. यासाठी युवकांना योग्य मार्गदर्शनाची गरज भासते. एक पाऊल चुकल्यास भविष्यातील मोठा धोका उद्भवू शकतो. जीवनाला आकार देण्याचे काम मार्गदर्शक शिक्षक करत असल्याचे सांगितले. तर धोरणात्मक निर्णयाने महाराष्ट्राला दिशा देण्याचे काम सामाजिक भावनेने केले पाहिजे असल्याची भावना व्यक्त केली.
मार्गदर्शक रेव्ह. प्रा. म्हणाले की, संघर्षातून जीवनाला यश मिळत असते. सकारात्मक विचार ठेवा, वाचनाने जीवनाला दिशा मिळत असते. यासाठी चांगल्या व्यक्तीमत्वांची आत्मचरित्र वाचली गेली पाहिजे. करिअर तात्काळ घडत नसते, त्यामागे सातत्य, परिश्रम व कष्टाची जोड असावी लागते. आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करा. नोकरी म्हणजे करिअर नाही, एखाद्याचा नोकरी वेगळी व करिअर वेगळा असू शकतो. चांगल्या नीती मूल्याने आपले व्यक्तीमत्व घडून यशस्वी होता येत असल्याचे त्यांनी सांगितले. तर कोणत्या क्षेत्रात कशा पध्दतीने करिअर निवडावे? यावर त्यांनी मार्गदर्शन केले.
प्रयास काऊसालिग सेंटरचे डॉ. शालिनी उजागरे म्हणाल्या की, मुले व मुलीना जीवनात काहीतरी करण्याची त्यांच्यात जिद्द असते. योग्य वयात योग्य मार्गदर्शन मिळाल्यास जीवन यशस्वी बनते व सायन्स कॉमर्स आर्ट्स या विविध शाखेमध्ये करिअरची माहिती देऊन उद्योग व व्यवसाय ची देखील माहिती दिली. महाविद्यालयीन युवक व युवतींना योग्य मार्गदर्शन मध्ये विविध क्षेत्रात कार्यरत करणाऱ्यांची माहिती देण्यात आली. नागरिकांसाठी बॉईज व गर्ल्स हायस्कूलमध्ये मोफत प्रवेश प्रक्रिया दिले जाणार असुन १ ली ते ४ थी साठी युनियन ट्रेनिंग कॉलेज येथे मोफत प्रवेश प्रक्रिया देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सृष्टी डोंगरे यांनी केले तर आभार सूनित ढगे यांनी प्रार्थना करून मांनले.