स्वाभिमानी शिक्षक संघटनेचा दराडे यांना पाठिंबा जाहीर
अहमदनगर (प्रतिनिधी)- नाशिक शिक्षक मतदार संघाचे उमेदवार किशोर दराडे यांना अहमदनगर जिल्हा स्वाभिमानी शिक्षक संघटनेच्या वतीने पाठिंबा देण्यात आला असुन स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रसाद शिदे यांनी पाठिंब्याचे पत्र किशोर दराडे यांना दिले. यावेळी स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष के.पी.पाटील यांनी दराडे यांना पाचही जिल्ह्यातील स्वाभिमानी शिक्षक संघटनेच्या वतीने शिक्षकांच्या वतीने आपल्या उमेदवारी पाठिंबा राहील असा शब्द दिला.
उमेदवारी पाठिंबा दिल्यामुळे किशोर दराडे यांनी स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे आभार मानले. या प्रसंगी शिदे म्हणाले की, अहमदनगर जिल्ह्यातील तसेच नाशिक विभागातील शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी दराडे नेहमीच अग्रेसर असतात. गेल्या ६ वर्षात सतत कार्यरत राहून शिक्षकांना सन्मान देण्याचे काम दराडे यांनी केले आहे.
शिक्षकांनी दराडे यांना पाठिंबा देणे गरजेचे आहे हा विचार मनाशी घेऊन, जिल्ह्यात प्राबल्य असणाऱ्या स्वाभिमानी शिक्षक संघटनेतील पदाधिकारी शेकडो शिक्षक यांच्या वतीने किशोर दराडे यांना पाठिंबा देण्यात आला आहे.जिल्ह्यात 12 तालुक्यांमध्ये संघटना कार्यरत आहे. तालुक्यातील तालुकाध्यक्ष शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कार्य करत आहेत. किशोर दराडे यांच्या माध्यमातून विनाअनुदानित शिक्षक अंशतः अनुदानित,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आदिवासी आश्रमशाळेचे ,जूनी पेन्शन योजना असे असंख्य प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला आहे भविष्यात देखील शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न व्हावेत ही देखील इच्छा शिदे यांनी व्यक्त केली याप्रसंगी जिल्हा अध्यक्ष प्रसाद शिंदे , वैभव सांगळे, समीर पठाण, बाबासाहेब गवते, सुरज घाटविसावे, सुनील अंगारखे, किशोर कार्ले, अनिता साठे, संतोष गव्हाणे, महेश भगत, अमोल क्षीरसागर, शंकर निंबाळकर आदि शिक्षक शिक्षकेतर बांधव उपस्थित होते.