स्व.मीनाताई ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शहर शिवसेनेच्यावतीने अभिवादन

0
70

स्व.मीनाताई ठाकरे या महिलांची प्रेरणा होत्या – महापौर रोहिणी शेंडगे

अहमदनगर प्रतिनिधी – शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केल्यानंतर माँ साहेब मीनाताई ठाकरे यांनी शिवसेनेच्या कार्यात मोठे योगदान दिले.शिवसैनिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला.विशेषत: महिलांच्या प्रश्नांबाबत त्या अग्रही असत.शिवसैनिकांची मायेने चौकशी करुन त्यांच्या अडचणी त्या सोडवत.त्यांच्या विचाराने प्रेरित होऊन अनेक महिलांनी शिवसेनेस साथ दिली.

शिवसेनेनेही महिलांचा नेहमीच सन्मान करुन विविध पदे महिलांना दिले,त्यांची प्रेरणा या मीनाताई होत्या,असे प्रतिपादन महापौर रोहिणी शेंडगे यांनी केले.

स्व.मीनाताई ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्या वतीने शहरप्रमुख संभाजी कदम यांच्या कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी महापौर रोहिणी शेंडगे,शहरप्रमुख संभाजी कदम,सभापती पुष्पा बोरुडे,माजी महापौर सुरेखा कदम, महिला जिल्हाध्यक्षा आशा निंबाळकर,शहराध्यक्षा अरुणा गोयल,माजी गटनेते संजय शेंडगे,नगरसेवक दत्ता कावरे,सचिन शिंदे,संग्राम शेळके, दिपक खैरे,शाम नळकांडे, प्रशांत गायकवाड,दत्ता जाधव, संग्राम कोतकर,संतोष गेनप्पा, सुरेश तिवारी,अशोक दहिफळे,संजय आव्हाड, गणेश झिंजे आदि उपस्थित होते.

याप्रसंगी शहरप्रमुख संभाजी कदम म्हणाले,हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या माध्यमातून नेहमीच महिलांचा सन्मान केला आहे,माता-भगिनींचे प्रश्न सोडविण्यासाठी शिवसैनिक पुढाकार घेत असतात.

शिवसेनेच्या जडण-घडणीत स्व.मीनाताई ठाकरे यांचे मोठे योगदान राहिले आहे. महिलांना सन्मान मिळाला पाहिजे,ही त्यांची भुमिका शिवसैनिकांनी कसोशीने पाळत आहे.शिवसेनेमुळेच आजही विविध पदांवर महिला चांगल्या पद्धतीने काम करत आहे.त्यासाठी माँ साहेबांची प्रेरणा कायम असल्याचे सांगितले.

याप्रसंगी सुरेखा कदम, पुष्पा बोरुडे,आशा निंबाळकर, अरुण गोयल आदिंनी मनोगतातून स्व.मीनाताई ठाकरे यांच्या कार्याचा गौरव केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन शिंदे यांनी केले तर आभार दत्ता जाधव यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here