स्व.शंकरराव घुले यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय गुणवंत कामगार पुरस्काराचे वितरण
स्व.शंकरराव घुले यांचे कार्य राज्याला दिशादर्शक – सुभाष लोमटे
नगर – कष्टकार्यांचे जीवनमान उंचविण्याचे काम स्व.शंकरराव घुले यांनी केले. त्यांनी कामगारांच्या प्रश्नांसाठी मोठे आंदोलन उभे करुन त्यांना त्यांचे हक्क मिळवून दिले. त्यांच्या आंदोलनामुळे कष्टकर्यांसाठीच्या अनेक सरकारी योजना प्रत्यक्षात अंमलात आल्या. आपले हक्क मिळवयाचे असेल तर संघटन हे महत्वाचे हे ओळखून त्यांनी राज्यभरातील कष्टकार्यांसाठी मौलिक काम केले आहे. कॉ.बाबा आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली स्व.घुले यांनी कष्टकर्यांचे मोठे संघटन उभे करुन कष्टकर्यांना न्याय मिळवून दिला. स्व.घुले यांची उणिव आजही संघटनेस भासत आहे. आज त्यांच्या नावाने राज्यस्तरीय गुणवंत कामगार पुरस्कार देण्याचा उपक्रम स्त्युत असून, त्या माध्यमातून कष्टकार्यांचा खर्या अर्थाने सन्मान होत आहे. नगरची कष्टकर्यांची संघटना राज्याला दिशादर्शक असेच काम करत आहेत. कष्टकार्यांच्या प्रश्नांसाठी नेहमीच त्यांचा पाठपुरावा असतो. या पुरस्कार सोहळ्यानिमित्त कष्टकार्यांच्या पाठिवर कौतुकाची थाप पडली असल्याचे प्रतिपादन साथी सुभाष लोमटे यांनी केले.
कष्टकार्यांचे नेते माजी नगराध्यक्ष स्व.शंकरराव घुले यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय गुणवंत कामगार पुरस्काराचे वितरण साथी सुभाष लोमटे व राज्य अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष अविनाश पाटील यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी हमाल पंचायतचे जिल्हाध्यक्ष अविनाश घुले, माथाडी पतसंस्थेचे चेअरमन रविंद्र भोसले, हमाल पंचायतचे उपाध्यक्ष गोविंद सांगळे, मधुकर केकाण, ज्ञानदेव पांडूळे, विलास कराळे, अॅड.विक्रम वाडेकर, अॅड.वैभव कदम, विष्णूपंत म्हस्के, अशोकराव बाबर, अंबादास सोनवणे, आदिनाथ गिरमे, शरद वारकड, शंकरराव बारस्कर, सुरेश आरगडे, अंकुश आरगडे, अॅड. निर्मला चौधरी, आर्कि.अर्शद सय्यद, बाळासाहेब वडागळे, पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन नवनाथ बडे, तज्ञ संचालक संजय घुले, संचालक सुरेश मोहिते, आदिनाथ चेके, मच्छिंद्र दहिफळे, दिगंबर सोनवणे, लक्ष्मण वायभासे, सागर पोळ, मंदाबाई सुर्यवंशी, रत्नाबाई आजबे, राम सरोदे, सचिव संजय महापुरे आदि उपस्थित होते.
प्रारंभी हमाल पंचायत येथील स्व.शंकरराव घुले यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी राज्यस्तरीय गुणवंत कामगार पुरस्कार कॉ.बाबा आरगडे, रामदास गाढवे, राम हारदास (शेवगांव) यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ व धनादेश देऊन सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी अविनाश पाटील म्हणाले, स्व.शंकरराव घुले यांचे कष्टकरी, सर्वसामान्यांप्रती असलेले योगदान खूप मोठे आहे. समाजातील प्रत्येक घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या कार्यातही ते सक्रिय असत. त्यांच्या जयंतीनिमित्त गुणवंत कामगारांना पुरस्कार देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम होत आहे. अशा उपक्रमातून त्यांचे कार्य कायम जीवंत ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याचे सांगितले.
प्रास्तविक अविनाश घुले म्हणाले, हमाल पंचायतीच्या माध्यमातून कष्टकार्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम स्व.शंकरराव घुले यांनी केले. त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे सरकारच्या योजना कष्टकर्यांपर्यंत पोहचल्या. कष्टकार्यांना त्यांचे हक्क मिळवून देत त्यांची पतनिर्माण करण्याचे काम केले. कष्टकार्यांच्या पाठिवरील ओझे कमी करण्याबरोबरच त्यांचे आरोग्य आबाधित राहण्यासाठी हॉस्पिटल, आर्थिक उन्नत्तीसाठी पतसंस्था, गुणवंत पाल्यांना प्रोत्साहन अशा अनेक उपक्रमांमुळे खर्या अर्थाने कष्टकार्यांना न्याय मिळाला आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय गुणवंत कामगारांना पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा उचित सन्मान केला जात आहे. त्यामुळे कष्टकर्यांमधील आत्मविश्वास वाढण्यास मदत होत आहे. यानिमित्त त्यांचे कार्य कायम स्मरणात राहील, असे सांगितले.
यावेळी पुरस्कारार्थ बाबा आरगडे यांनी मनोगतातून स्व.शंकरराव घुले यांच्या समवेत केलेल्या विविध आंदोलने, उपक्रमांमुळे कष्टकर्यांचे प्रश्न मार्गी लावल्याचे समाधान आहे. त्यांच्या नावाने मिळालेला पुरस्कार हा कष्टकर्यांचा असल्याचे सांगितले.
सूत्रसंचालन संजय महापुरे यांनी केले तर आभार रविंद्र भोसले यांनी मानले. या डॉ.विजय कवळे, नंदू डहाणे, बबन आजबे, सचिन ठुबे, कन्हैय्या बालानी, सुनिल गोसावी, प्रदिप काळे, उत्तम साठे, वाल्मिक कदम, शरद आरगडे, सुनिल आरगडे, प्रियंका आरगडे, संग्राम आरगडे, तारकराम झावरे, अप्पासाहेब वाबळे, अंकुशराव आरगडे आदिंसह कष्टकरी, हमाल-मापाडी, माथाडी मोठ्यासंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन स्व.शंकरराव घुले माथाडी कामगारांची सहकारी पतसंस्थेच्यावतीने करण्यात आले होते.