एपीआय गोरक्ष पालवे,पीएसआय नंदकुमार ठोंबरे यांची कर्तबगार कामगिरी
अंमळनेर प्रतिनिधी – सुनिल आढाव
अंमळनेर पोलीस ठाणे हद्दीतील डोंगरकिंन्ही जवळ असणाऱ्या मिसाळवाडी येथुन पाच ऑक्टोंबर रोजी रात्री एक ते दोनच्या सुमारास स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर चोरी गेला आहे अशी तक्रार दाखल होताच अंमळनेर पोलीस ठाण्याचे ठाणे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरक्ष पालवे यांनी तपासाची चक्रे गतीमान फिरवून ट्रॅक्टर सह दोन ट्रॅक्टर गजाआड केले आहे.ट्रॅक्टर चोरी करणाऱ्या आरोपींची नावे हि अंबादास विक्रम मिसाळ वय ३८ रा.पिंपळनेर ता.शिरुर व लहु कारभारी कांबळे वय ४५ रा.पिंपळनेर ता.शिरुर अशी आहेत.
अंमळनेर पोलीस ठाणे हद्दीतील डोंगरकिंन्ही जवळ असणाऱ्या मिसाळवाडी येथुन मध्यरात्री लहु कांबळे व अंबादास मिसाळ यांनी ट्रॅक्टर चोरी करुन हा ट्रॅक्टर पिंपळनेर शिवारात निर्मनुष्य ठिकाणी उभा करुन त्या ठिकाणाहून पळ काढला होता मिसाळवाडी येथुन ट्रॅक्टर चोरी हा पिंपळनेर येथील लहु कांबळे व अंबादास मिसाळ यांनीच चोरुन घेऊन गेल्याची गोपनीय माहिती अंमळनेर पोलीस ठाण्याचे ठाणे प्रमुख एपीआय गोरक्ष पालवे यांना मिळताच त्यांनी हदगाव ता.शेवगाव येथुन ट्रॅक्टर चोर लहु कांबळे व अंबादास मिसाळ दोघेही रा.पिंपळनेर ता.शिरुर कासार यांच्या मुसक्या आवळल्या होत्या .
मिसाळवाडी येथील ट्रॅक्टर चोरी करणाऱ्या चोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी अंमळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरक्ष पालवे यांच्या सह पीएसआय नंदकुमार ठोंबरे पोलीस कर्मचारी रवि आघाव,संतोष काकडे,सचिन तांदळे,सोपान येवले ,प्रभाकर खोले,पंकज आघाव,आशोक फुलेवाड,युवराज बहिरवाळ,विलास गुंडाळे,बदाम आर्सुळ यांनी अथक परिश्रम घेतले होते या प्रकरणाचा पुढील तपास हा डोंगरकिंन्हीचे बिट अंमलदार संतोष काकडे हे करत आहेत .
अंमळनेर पोलीस ठाण्याचे ठाणे प्रमुख एपीआय गोरक्ष पालवे यांनी शेवगाव,बोधेगाव येथे प्रत्यक्ष जाऊन अत्यंत बारकाईने तपास करुन हा ट्रॅक्टर चोरी करणाऱ्या लहु कांबळे व अंबादास मिसाळ रा.दोघीही पिंपळनेर ता.शिरुर यांना हदगाव ता.शेवगाव येथुन ताब्यात घेतले होते त्यांना कोर्टात हजर केले असता त्यांना बारा तारखेपर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आली असल्याची माहिती अंमळनेर पोलीस ठाण्याचे एपीआय गोरक्ष पालवे यांनी दिली.
———————–
मिसाळवाडी येथुन ट्रॅक्टर चोरी करणाऱ्या चोरांना ट्रॅक्टर सह ताब्यात घेण्यात यश आले असले तरी या चोरी प्रकरणात आणखी कोणांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग आहे का ? या दिशेने पुढील तपास सुरू करण्यात आलेला असल्याची माहिती अंमळनेर पोलीस ठाण्याचे ठाणे प्रमुख एपीआय गोरक्ष पालवे,पीएसआय नंदकुमार ठोंबरे यांनी दिली.
——–
अंमळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरक्ष पालवे यांनी अत्यंत कमी वेळात कौशल्यपूर्ण तपास करुन व आपले खास खबरी यांची देखील मदत घेऊन ट्रॅक्टर चोरांना ट्रॅक्टर सह ताब्यात घेतले असल्यामुळे पोलिसांच्या कामकाजा विषयी नागरीकांच्या मनात आपुलकी निर्माण झाली आहे.