अखिल भारतीय छावा संघटनेचे मुख्यमंत्री यांना निवेदन
छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा तत्काळ बसवण्याची मागणी
मनपा अधिकारी पुतळा बसवण्यासाठी टाळाटाळ करत असून आझाद मैदान येथे १० जूनला उपोषणाचा इशारा
अहमदनगर (प्रतिनिधी)- अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने अहमदनगर महानगरपालिकेला पत्र दिले होते की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पुतळा बसविण्यात यावा अन्यथा प्रोफेसर चौक येथील पुतळ्याच्या चौथाऱ्याखाली उपोषण करणार असल्याचे सांगितले मात्र अहमदनगर महानगरपालिकेने ९ मे २०२४ रोजी शहर अभियंता अहमदनगर महानगरपालिका यांच्या पत्रानुसार १० ते १५ दिवसांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या चौथ्याऱ्याचे काम पूर्ण करून पुतळा बसविण्यात येणार असे पत्र दिले होते मात्र त्या चौथ्याऱ्याचे अद्यापही काम पूर्ण झालेले नाही याचा अर्थ असा निघतो की शहर अभियंता व मनपा आयुक्त हे जाणीवपूर्वक टाळाटाळ करून दुर्लक्ष करून विलंब करीत आहे.
किंवा शहर अभियंता व आयुक्त सदर काम पूर्ण करण्यास अकार्यक्षम असून सदर काम करण्याची त्यांची क्षमता नाही म्हणून सदर शहर अभियंता व मनपा आयुक्त यांची सदर कामासंदर्भात चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी व लवकरात लवकर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा तात्काळ बसविण्यात यावा अन्यथा मुंबई येथील आझाद मैदान येथे १० जून २०२४ रोजी उपोषण करण्यात येणार असल्याचे अखिल भारतीय छावा संघटनेचे जिल्हाध्यक्षा सुरेखाताई सांगळे, शिवप्रतिष्ठान संघटनेचे जिल्हा अध्यक्ष बापू ठाणगे, विश्व वारकरी परिषदेचे जिल्हाध्यक्ष साहेबराव पाचरणे, दत्ताभाऊ वामन, संदीप पखाले, रोहित गुंजाळ, पिंटू पवार, भैया चौधरी, अभय पतंगे, किरण उंडे, सुनील ठाकरे यांनी निवेदनात सांगितले.