वादग्रस्त वक्तव्य करणार्या मनोहर भिडे यांच्यावर कारवाई करावी – अंबादास गारुडकर
नगर – वारंवार वादग्रस्त विधान करणार्या मनोहर भिडे यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. याप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष अंबादास गारुडकर, जिल्हाध्यक्ष सुभाष लोंढे, महानगर अध्यक्ष दत्ता जाधव, तालुकाध्यक्ष रामदास फुले, राजेंद्र पडोळे, शरद कोके, बाळासाहेब भुजबळ, भरत गारुडकर, मनोज गाडळकर, डॉ.रणजित सत्रे, ज्ञानदेव खराडे, प्रणय जाधव, आर्यन गिरमे, अनिल इवळे, श्रीकांत मांढरे, माऊली गायकवाड, मनोज बनकर, भाऊसाहेब कोल्हे, निळकंठ विधाते आदि उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मनोहर भिडे यांच्याकडून वारंवार महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्य करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी मनोहर भिडे यांनी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. त्यानंतर त्यांनी आता राष्ट्रपिता महात्मा गांधी व पंडित जवाहरलाल नेहरु यांच्याविषयी वादग्रस्त केले आहे.
मनोहर भिंडे यांच्याकडून वारंवार महापुरुषांचा अपमान करत समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे समाजात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. तरी मनोहर भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करुन कठोर कायदेशीर कारवाई करावी, असेही निवेदनात म्हटले आहे.
याप्रसंगी अंबादास गारुडकर म्हणाले, मनोहर भिडे नामक व्यक्ती वारंवार विविध महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधाने करुन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. या वादग्रस्त वक्तव्यांला कोणताही पुरावा नसतांना फेक पद्धतीने महापुरुषांचा अवमान करत आहे. वारंवार होणार्या त्यांच्या वक्तव्यामुळे समाजात संतापाची लाट निर्माण होत आहे.अशा व्यक्तींवर तातडीने कठोर कारवाई व्हावी, जेणे करुन यापुढे कोणी महापुरुषांचा अवमान करण्याची हिंमत करणार नाही.
यावेळी सुभाष लोंढे म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून महापुरुषांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य करुन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यात मनोहर भिडे यांच्याकडून वारंवार होत असलेल्या वादग्रस्त विधाने निंदनीय असेच आहे. त्यांच्यावर कारवाई केल्यास अशा प्रवृत्तीला नक्कीच चाप बसेल असे सांगितले.
याप्रसंगी दत्ता जाधव म्हणाले, मनोहर भिडे यांनी जर अशी बेजबाबदार पणाची वक्तव्य थांबली नाही तर नगर जिल्ह्यात ठिकठिकाणी उग्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येतील.