अजित पवारांनी सुनेत्रा पवारांच्या प्रचाराचा नारळ फोडला
बारामती : अजित पवारांनी सुनेत्रा पवारांच्या प्रचाराचा नारळ फोडला आहे. कन्हेरीच्या मारूती मंदिरात नारळ फोडून प्रचाराला सुरुवात केली आहे.- Advertisement -
1967 पासून आतापर्यंत पवार कुटुंबीयातला कुठलाही सदस्य निवडणुकीला रिंगणात उतरला की त्याचा प्रचाराचा शुभारंभ होतो बारामती तालुक्यातील कन्हेरी इथल्या मारुती मंदिरातून होतो.
आज सुनेत्रा पवारांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. यावेळी अजित पवारांचा मुलगा जय पवार आणि अजित पवारांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
त्यातच अजित पवारांनी आणि सुनेत्रा पवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मोठं शक्ती प्रदर्शन केलं आणि त्यानंतर आज अजित पवारांनी प्रचाराचा नारळ फोडत प्रचाराचा शुभारंभ केला.
यावेळी सुनेत्रा पवार सभेत म्हणाल्या कि,मी बारामतीची सून, बारामतीकरांचे फेडेल ऋण त्यामुळे घड्याळाला जास्तीत जास्त मतांनी निवडून देण्यासाठी आवाहन केले.
- Advertisement -