कर्जत प्रतिनिधी – गणेश जेवरे
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कर्जत येथील सभेमध्ये अनेकांची खिसे आणि मोबाईल रिकामे करणाऱ्या चार चोरट्यांना पोलिसांनी जेरबंद केले.त्या सर्वांना आज न्यायालयामध्ये हजर केले असता चार दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे.
दिनांक १३ नोव्हेंबर या दिवशी कर्जत शहरांमध्ये बाजार तळ याठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार,सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण व दोन राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये प्रचंड मोठी जाहीर सभा झाली.
सभेच्या ठिकाणी उपमुख्यमंत्री व इतर मंत्री व आमदार रोहित पवार यांचे आगमन गोदड महाराज मंदिर या ठिकाणी होताच तिथे उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची प्रचंड मोठी गर्दी झाली होती.यावेळी मंदिराच्या प्रवेशद्वारात मोठ्या प्रमाणात ढकलाढकली देखील झाली या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्ञानेश्वर प्रभाकर सायकर,राहणार सायकर वस्ती,राशीन त्यांच्या पाठीमागे असलेल्या अनोळखी इसमाने त्यांचे पॅंटची पाठीमागील खिशातील हात घालून पाकीट काढत असल्याचे त्यांना जाणवल्याने त्यांनी त्या अनोळखी इसमाचा हात पकडला.
त्यावेळी त्याचे हातात सायकर यांना त्यांचे पाकीट दिसले,त्यांना जोराचा धक्का देऊन हातातील पाकीट हिसकावून साथीदारांसह पळून जाण्याचा प्रयत्न करत असतानाच त्यांनी आरडा ओरड केल्याने जवळच बंदोबस्त करत हजर असलेले पोलीस यांनी त्याचा पाठलाग करून त्यास पकडले असून त्यांचे नाव अमोल पंढरीनाथ विटेकर वय २५ वर्षे, राहणार माऊली नगर,पेठ बीड, तालुका जिल्हा बीड,नदीम अख्तर फय्याज अहमद,वय ३० वर्ष, राहणार आजाद नगर, मालेगाव जिल्हा नाशिक असे असून सदरचे आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी विविध पोलिस स्टेशनला चोरी सारखे गुन्हे दाखल आहेत.त्याचेवर कर्जत पोलीस स्टेशन ला जबरी चोरी करण्याचा प्रयत्न केल्या बाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्याच दिवशी सभेच्या ठिकाणी आणखी काही जणांची पैसे व आणखी २ लोकांचे मोबाईल चोरी गेले होते.तिथे दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.या सर्वांना आज न्यालायत हजर केले असता न्यालायने त्यांना ४ दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
याच्याकडून आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अंधारे हे करत आहेत.
या चोरट्यांना पकडण्याचे काम सहाय्यक पोलीस निरीक्षीक सुरेश माने, सतीश गावित, पोलीस उप निरीक्षक अमरजित मोरे, पोलीस अंमलदार अमित बर्डे, शकील बेग, पांडुरंग भांडवलकर, श्याम जाधव, सुनिल खैरे, गोवर्धन कदम स्थानिक गुन्हे शाखेचे बबन मखरे, संदीप चव्हाण यांनी केली आहे.