अतिवृष्टीचे त्वरित पंचनामे करुन नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना तातडीने मदत द्यावी

- Advertisement -

अतिवृष्टीचे त्वरित पंचानामे करुन नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना तातडीने मदत द्यावी

भाजपाच्यावतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

अहमदनगर प्रतिनिधी – जिल्ह्यातील पाथर्डी, शेवगांव व नगरसह जिल्ह्यात काही ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीचे त्वरित पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्यात यावी,  या मागणीचे निवेदन भाजपच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी संदिप निचित यांना देऊन त्यांच्याशी चर्चा केली. याप्रसंगी भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे, आ.मोनिकाताई  राजळे, आ.बबनराव पाचपुते, माजी आ.शिवाजीराव कर्डिले, अशोक खेडकर, दिलीप भालसिंग, माणिक खेडकर, अंबादास पिसाळ, वसंत चेडे, अनिल लांडगे, वसंत सोनवणे, जिजाऊ लोंढे, बाळासाहेब अकोलकर, मनोज कोकाटे आदि उपस्थित होते.

जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या आठवड्यात जिल्ह्यात पाथर्डी, शेवगाव, नगर तालुक्यासह इतर काही ठिकज्ञाणी मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेतकरी, व्यवसायिक, पशुपालक यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले, त्यामुळे शेतकरी व छोटे उद्योग धंदे करणारे अनेक व्यावसायिक हवालदिल झाले आहेत. प्रशासन म्हणून आपणाकडून तातडीने मदत होऊन त्यांना दिलासा देणे आवश्यक आहे.     त्यासाठी आम्ही खालील मागण्यांचे निवदेन आपणाकडे देत आहोत.

    पुराचे पाणी तसेच बंधाारे फुटल्याने अनेक शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे, त्यांना सरसकट 60,000 एकरी मदत मिळावी व ती तातडीने आठ दिवसात शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग व्हावी. छोटे व्यवसायिक उद्योग-धंदे करणारे यांच्या दुकानात पाणी शिरल्यामुळे त्यांचा कच्चामाल तसेच किराणामाल निकामी झालेला आहे, त्यामुळे त्यांना तातडीने एक लाख रुपये नुकसान भरपाई मिळावी. गायी, म्हशी, शेळ्या, कोंबड्या पाळणारे पशुपालक यांच्या पशुधनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे, त्यांना गाई-म्हशीसाठी प्रत्येकी एक लाख रुपये व शेळ्या, कोंबड्यासाठी दहा हजार रुपये आर्थिक मदत मिळावी.

    ज्यांच्या घरांचे नुकसान झाले आहे किंवा पडझड झालेली आहे, घरातील भांडीकुंडी वाहून गेलेली आहेत. अशा नुकसानग्रस्तांना प्रत्येकी 50 हजार रुपये मदत मिळावी. अनेक शेतकर्‍यांच्या विहिरी  बुजल्या व शेततळे फुटले, वाहून गेले अशा शेतकर्‍यांना एक लाखांची भरपाई मिळावी. अनेक रस्ते फुटलेले आहेत, पुलाची व बंधार्‍यांची पडझड झालेली आहे व काहीठिकाणी पाझर तलाव फुलेले आहेत. पुढील हंगामाच्या दृष्टीने शेतकर्‍यांना शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी बंधारे व पाझर तलाव यांची दुरुस्ती व्हावी, तुटलेले पुलाचीही दुरुस्ती व्हावी. अनेक ठिकाणी विजेचे खांब पडलेले आहेत, वाकले आहेत, मोडले आहेत, तसेच ताराही तुटलेल्या आहेत, त्यामुळे ही दुरुस्ती तातडीने व्हावी. रब्बी हंगामातील कांदा लागवड, ऊस लागवड तसेच शेतीची इतर कामे चालू असल्यामुळे  पाणीपुरवठा तसेच शेतीची इतर अवजारे चालवण्यासाठी विजेचीआवश्यकता आहे, परंतु विजेचा लपंडाव चालू असल्यामुळे पाणी उचलता येत नाही, त्यामुळे तातडीने वीज पुरवठा सुरळीत करावा. जळालेले ट्रान्सफार्मर दुरुस्ती करुन मिळावेत, तसेच ओव्हरलोड झालेले ट्रान्सफार्मरचा ला विभागून नवीन ट्रान्सफार्मर देण्यात यावेत.

    जनजीवन सुरळीत होईल, अशी सर्व कामे दुरुस्त्या, पंचनामे तातडीने करुन नागरिकांना  सहकार्य करावे व दिलसा द्यावा. वरील मागण्यांचा निर्णय ताबोडतोब न झाल्यास जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात रास्तारोको आंदोलन करण्यात येईल व याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही निवेदनात म्हटले आहे.

    निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री ना.उद्धवजी ठाकरे व विरोधीपक्ष नेते ना.देवेंद्रजी फडणवीस यांनाही पाठविण्यात  आल्या आहेत.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles