प्रत्येकाची दिवाळी मंगलमय व गोड व्हावी यासाठी सामाजिक उपक्रमाची गरज – भूपेंद्र रासणे
अहमदनगर प्रतिनिधी – सण,उत्सव साजरी करत असताना सामाजिक बांधिलकी जोपासत अनाथांना आधार देण्याचे काम गेल्या तीन वर्षांपासून आम्ही सर्व मित्र परिवार करत आहोत.दिवाळीचा सण हा सर्वांना आनंद व गोडवा देणारा सण म्हणून ओळखला जातो.
भावनांच्या स्पर्शाला साथ देत अनामप्रेम संस्थेमधील मधील विद्यार्थ्यांबरोबर दिवाळीचा उत्सव गोड करण्याचा प्रयत्न केला आहे सर्वांची दिवाळी मंगलमय व गोड व्हावी यासाठी आम्ही सर्वांनी खारीचा वाटा उचलत विद्यार्थ्यांना जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता करून दिली.
सकारात्मक दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम प्रत्येकाने करावे जेणेकरून प्रत्येकाच्या सुख-दुःखात सामील होता येते आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो याभावनेतून सामाजिक उपक्रम राबवत असतो असे प्रतिपादन भुपेंद्र रासने यांनी व्यक्त केले.
दिवाळीनिमित्त अनामप्रेम संस्थेमधील गरजू विद्यार्थ्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले.
यावेळी कौस्तूभ देशपांडे सौ.सोनाली देशपांडे, भुपेंद्र रासने सौ. पुनम रासने, सौ.वैशाली राजहंस, सौ. क्षितीजा होशिंग, संकेत होशिंग, श्रीजीत हडप, क्षितीजा हडप, व्यंकटेश देशपांडे, स्वरा होशिंग तसेच आदी मित्रपरिवार या वेळी उपस्थित होते.