नेवासा फाटा प्रतिनिधी – महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषदेच्या नेवासा तालुका अध्यक्षपदी पत्रकार कमलेश गायकवाड यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.
सदर नियुक्तीचे पत्र संस्थापक अध्यक्ष अनिल भोसले, अहमदनगर जिल्हा अध्यक्ष दीपक कदम यांच्या हस्ते तसेच जिल्हा उपाध्यक्ष मार्कस बोर्डे, फादर दिलीप जाधव, फादर जॉन, सिस्टर जोसी, विजय लोंढे यांच्या उपस्थितीत नुकतेच देण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष दीपक कदम यांनी गायकवाड यांनी या पदाच्या माध्यमातून ख्रिस्ती समाजाचे प्रश्न सोडवून ख्रिस्ती विकास परिषदेचा लौकिक वाढविणारे कार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली.
ख्रिस्ती विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष अनिल भोसले यावेळी बोलताना म्हणाले की, अल्पसंख्याक ख्रिस्ती समाजाला यथोचित न्याय मिळण्याची आग्रही भूमिका परिषदेची असून समाजाला सन्मान व स्वाभिमानाची वागणूक मिळण्यासाठी प्रयत्नशील आहोत. गायकवाड यांच्या माध्यमातून नेवासा तालुक्यात ख्रिस्ती विकास परिषद भरीव कामगिरी करण्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी बोलताना गायकवाड यांनी ख्रिस्ती विकास परिषदेच्या वरिष्ठांसह धर्मगुरूंनी मोठ्या विश्वासाने टाकलेली जबाबदारी सार्थ ठरविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. तालुक्यातील ख्रिस्ती समाजाचे प्रश्न सोडविणे आपले काम नसून कर्तव्य राहणार असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
गायकवाड यांच्या या निवडीबद्दल राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, आमदार सुधीर तांबे, आमदार लहू कानडे, तालुका काँग्रेसचे नेते सुदाम कदम, आदी मान्यवरांसह सर्वच स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.