अशोकभाऊ फिरोदिया स्कूलचे इस्कॉनच्या मूल्यशिक्षण संवर्धन स्पर्धेत यश
वरद लोखंडे जिल्ह्यात प्रथम
अहमदनगर (प्रतिनिधी)- अ.ए.सो. च्या अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी इस्कॉन तर्फे आयोजित करण्यात आलेल्या मूल्यशिक्षण संवर्धन स्पर्धेत घवघवीत यश संपादन करुन बक्षिसे पटकाविली. वरद संतोष लोखंडे या विद्यार्थ्याने जिल्ह्यात प्रथम येण्याचा बहुमान पटकाविला.
विद्यार्थ्यांमध्ये मूल्य शिक्षणाची रुजवण होण्याच्या उद्देशाने भगवद्गीतावर आधारित इस्कॉन तर्फे जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील 250 शाळांच्या 11 हजार पेक्षा अधिक विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. ही स्पर्धा स्पर्धेचे प्रमुख व्यवस्थापक गिरधारी दास यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम आलेल्या लोखंडे या इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यास विद्युत (इलेक्ट्रिकल) सायकलचे बक्षीस देण्यात आले. जिल्ह्यात चौथी आलेली अनघा व्यंकटेश भिंगारकर या विद्यार्थिनीस स्मार्टवॉच प्रदान करण्यात आली. तर या स्पर्धेत आदित्य शेळके, कृष्णा दळवी, देवांगी ढगे, वेदांत शेळके यांनी देखील यश प्राप्त केले.
विजेत्या स्पर्धकांना संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया, उपाध्यक्ष अशोक मुथा, सहकार्यवाह गौरव फिरोदिया व खजिनदार प्रकाश गांधी यांनी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या. यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य प्रभाकर भाबड, उपप्राचार्य कविता सुरतवाला, माध्यमिकचे विभाग प्रमुख वैशाली वाघ, प्राथमिकच्या विभाग प्रमुख रेखा शर्मा आदी उपस्थित होते.