- Advertisement -
कर्जत प्रतिनिधी – गणेश जेवरे
कर्जत तालुक्यातील लोणी मसदपूर येथील गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या सचिन विठ्ठल आडागळे, या युवकाने ग्रामस्थांना आणि महिलांना अश्लील शिवीगाळ केली आणि हा व्हिडिओ देखील वायरल केल्या प्रकरणी पोलिसांनी दणका देत त्यास जेल ची हवा खाण्यास पाठवले.

याबाबत घडलेली घटना अशी की, कर्जत तालुक्यातील लोणीमसदपूर या गावातील इसम सचिन विठ्ठल आडागळे, वय २७ वर्ष, राहणार लोणिमसदपूर, ता. कर्जत जि.अहमदनगर याचे विरुद्ध कर्जत पोलिस स्टेशन व हडपसर पोलीस स्टेशन पुणे येथे शरीराविरुद्ध व मालमत्ता विरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असताना ही व्यक्ती लोणी मसदपुर येथील महिला व गावकऱ्यांना अश्लील स्वरूपात शिवी गाळ करत होता.अश्लील शिवीगाळ चे व्हिडिओ तयार करून व्हायरल करत होता. या त्रासाला गावकरी त्रस्त झाल्याने त्यांनी कर्जत पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली होती.

हे प्रकरण कर्जत पोलिसांनी गांभीर्याने घेऊन पुढील होणारे गंभीर गुन्हे टाळण्यासाठी या युवक गुन्हेगारास कर्जत पोलिसांनी अटक केले आणि त्याचे विरुद्ध सीआरपीसी कलम १५१ (१)(३)प्रमाणे प्रतिबंधक प्रस्ताव माननीय प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सो, कर्जत यांच्याकडे सादर केला.
मा.न्यायाधीश श्री पळसापुरे सो यांनी नमूद आरोपीस आठ दिवस न्यायालयीन कोठडीत स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला आहे.ही कारवाई पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश माने, पोलीस नाईक पांडुरंग भांडवलकर, चालक नितीन नरोटे होमगार्ड अशोक धांडे यांनी केली आहे.
- Advertisement -