अहमदनगर कम्युनिटी हेल्थ सेंटर नव्या स्वरूपात…

- Advertisement -

स्नेहालयाने स्वीकारली श्नायडर कंपनीकडून जबाबदारी

अहमदनगर प्रतिनिधी – अनिल शाह

सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याकरिता सावेडीतील कुष्ठधाम रस्त्यावर सुरू करण्यात आलेल्या लार्सन अॅड टुब्रो स्वास्थ्य केंद्राचे नाव “अहमदनगर कम्युनिटी हेल्थ सेंटर” असे बदलण्यात आले. हे केंद्र चालवण्याची जबाबदारी स्नेहालयाने स्वीकारली आहे. नवीन स्वरूपातील “अहमदनगर कम्युनिटी हेल्थ सेंटर” चा शुभारंभ १७ सप्टेंबरला श्नायडर इलेक्ट्रीक अँड ऑटोमेशन कंपनीचे संचालक अरविंद पारगावकर, स्नेहालयाचे संस्थापक डॉ.गिरिश कुलकर्णी आदींसह मान्यवरांच्या उपस्थितीत झाला.

४ सप्टेंबर २००८ रोजी लार्सन अॅड टुब्रो कंपनीने सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्यांकरिता मोफत आरोग्य केंद्र सुरू केले. विविध तपासण्या सवलतीच्या दरात येथे केल्या जातात.

कंपनीचे वैद्यकीय अधिकारी डॉ.ऋषभ फिरोदिया यांनी या केंद्राची जबाबदारी स्वीकारली.१८ तज्ञ डॉक्टरांमार्फत आरोग्य तपासणी केली जाते. एल. अॅड टी. स्वास्थ्य केंद्र हे कॉरपोरेट सी.एस.आर. अंतर्गत चालवण्यात येणारे नगरमधील पहिले परिपूर्ण स्वास्थ्य केंद्र बनले.

सप्टेंबर २०२० मध्ये श्नायडर इलेक्ट्रिक अॅड ऑटोमेशनने एल अँड टी कंपनीचा कारभार हाती घेतला. त्यामुळे लार्सन अॅड टुब्रो स्वास्थ्य केंद्राचे नाव आता “अहमदनगर कम्युनिटी हेल्थ सेंटर” असे करण्यात आले. हे केंद्र चालवण्याकरिता स्नेहालय संस्थेची निवड करण्यात आली. नवीन स्वरूपातील “अहमदनगर कम्युनिटी हेल्थ सेंटर” चा शुभारंभ शुक्रवारी झाला.

श्नायडर इलेक्ट्रिक इंडियाचे नगर येथील संचालक अरविंद पारगांवकर, स्नेहालय संस्थेचे संस्थापक डाॅ. गिरीश कुलकर्णी, अध्यक्ष संजय गुगळे, सचिव राजीव गुजर, उद्योजक मिलिंद कुलकर्णी, कंपनीचे वरिष्ठ अधिकारी किशोर वैकर, शेखर देशमुख, ईश्वर हांडे, दीपाली टकले, योगेश ओझा, अड. श्याम आसावा, भारतसेवक निक कॉक्स व जॉयस, अनंत कुलकर्णी, प्रवीण मुत्याल, डॉ. मुकुंद उंडे, डॉ.गणेश झरेकर, डॉ. गजानन काशीद, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. ऋषभ फिरोदिया, समन्वयक प्राची वाबळे आदी यावेळी उपस्थित होते.

कंपनीचे कामगार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी सुरू करण्यात आलेले हे केंद्र आता नगर शहरातील गरजू मध्यमवर्गीयांसाठी आरोग्यसेवेचे आधार बनले आहे. डॉक्टरांच्या उत्तम रुग्णसेवेमुळे हे केंद्र आता नावारूपास आले असून स्नेहालयाच्या माध्यमातून ही सेवा आणखी विस्तारेल, अशी अपेक्षा श्री. पारगांवकर यांनी यावेळी व्यक्त केली. डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी कंपनीच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत श्नायडर कंपनीने टाकलेला विश्वास जपला जाईल, याची ग्वाही दिली. श्री. पारगावकर यांनी या केंद्रासाठी दिलेल्या योगदानाची त्यांनी प्रशंसा केली.

कोविड काळात उत्कृष्ट कार्य करणा-या संतोष निकम, अशोक चव्हाण, स्वप्नाली अमोलिक, नूतन निसळ, शरद पवार, सारिका माने या सेवकांचा सत्कार श्री. पारगावकर व डॉ. गिरीश कुलकर्णी यांच्या हस्ते यावेळी करण्यात आला. प्रास्ताविक डॉ. फिरोदिया यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समन्वयक प्राची वाबळे यांनी केले.

स्नेहालयाचे मुख्य पालक तथा उद्योजक मिलिंद कुलकर्णी यांनी आभार मानले.या प्रसंगी जास्तीत जास्त नागरिकांना या अहमदनगर कम्युनिटी हेल्थ सेंटरमाहिती व्हावी यासाठीच्या माहिती पुस्तिकेचे अनावरण प्रमुख पाहुण्याच्या हस्ते करण्यात आले.

सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याकरिता सावेडीतील कुष्ठधाम रस्त्यावर असलेल्या लार्सन अँड टुब्रो ‘स्वास्थ्य ” केंद्राचे नाव “अहमदनगर कम्युनिटी हेल्थ सेंटर” असे करण्यात आले.हे केंद्र स्नेहालयाच्या समवेत स्नाईडर कंपनी सुरु ठेवणार आहे या “अहमदनगर कम्युनिटी हेल्थ सेंटर” चा शुभारंभ स्नाईडर इलेक्ट्रीक अँड ऑटोमेशन कंपनीचे संचालक अरविंद पारगावकर, स्नेहालयाचे संस्थापक डॉ. गिरिश कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत फीत कापून संपन्न झाला.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles