अहमदनगर जिल्हयातील लोक न्यायालयांत १७५१३ प्रकरणे निकाली, ५० कोटी १४ लाख रुपयांची वसुली

- Advertisement -

राज्यात दुसऱ्या क्रमांकावर

 

अहमदनगर प्रतिनिधी – अहमदनगर जिल्हा व सर्व तालुका न्यायालयात ११ डिसेंबर रोजी लोक अदालतींचे आयोजन करण्यात आले होते. यात ९४८९० प्रकरणे ठेवण्यात आली होती. यापैकी १७५१३ प्रकरणे तडजोडीने निकाली काढत ५० कोटी १४ लाख रूपयांची वसूली करण्यात आली.

सर्वाधिक प्रकरणे निकाली काढणे व वसुलीत अहमदनगर जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव रेवती देशपांडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

अहमदनगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहमदनगर बार असोशिएशन व सेंट्रल बार असोशिएशन यांचे संयुक्त विदयमाने शनिवार, ११ डिसेंबर २०२१ रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन अहमदनगर जिल्हा न्यायालय तसेच सर्व तालुका न्यायालय येथे करण्यात आले.

राष्ट्रीय लोकअदालती मध्ये अहमदनगर जिल्हयामध्ये सर्व न्यायालयांतील दिवाणी, फौजदारी, एन.आय.अॅक्ट, बँकेची कर्ज वसुली,मोटार वाहन अपघात नुकसान भरपाई,कामगार न्यायालयांतील,कौटुंबिक वादाची, महावितरणाची समझोता योग्य तसेच न्यायालयांत येण्या अगोदरचे दाखलपूर्व प्रकरणे,आपसी समझोत्याकरीता ठेवण्यात आली होती.

अहमदनगर जिल्हयामध्ये १५०२१ दाखलपूर्व प्रकरणे मिटविण्यात आली.तर २४६८ प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यात आला तसेच ५० कोटी, १४ लाख २५ हजार ३११ रकमेची वसुली करण्यात आली. अहमदनगर जिल्हयातील सर्व न्यायालयांत हे लोकन्यायालय आयाजित करण्यात आले होते.

प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष सुधाकर वें. यार्लगड्डा, न्यायाधीश मिलिंद कुर्तडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली व अहमदनगर बार असोशिएशन अध्यक्ष अॅड अनिल सरोदे, सेंट्रल बार असोशिएशनचे अध्यक्ष अॅड. श्री. सुभाष काकडे, सरकारी वकिल अॅड. सतिष पाटील व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव रेवती देशपांडे, महानगर पालिका आयुक्त शंकर गोरे यांचे उपस्थितीत जिल्ह्यातील लोक अदालत पार पडल्या.

लोक अदालतीसाठी जिल्हा न्यायालयास पारंपरिक न्यायालयापेक्षा आगळे वेगळे स्वरूप देण्यात आले होते. बँका, महानगरपालिका व ग्रामपंचायत यांची दाखलपूर्व प्रकरणे मिटविण्यात आली. महानगर पालिकेची व ग्रामपंचायत कर वसुली प्रकरणे यामध्ये ठेवण्यात आली होती.

त्यासाठी वेगळा मंडप व पक्षकारांच्या सुविधेसाठी अनेक टेबल ठेवण्यात आले होते. कर वसुली प्रकरणांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. न्यायाधीश, वकिल, पोलिस, विधी स्वयंसेवक व न्यायालयाचे कर्मचारी यांच्या सहकार्याने लोक न्यायालय यशस्वी रितीने पार पडले.

कोविड प्रादुर्भाव असतांना देखील जिल्हयात राष्ट्रीय लोक अदालतीस उदंड प्रतिवाद मिळाला.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles