अहमदनगर जिल्हा ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक मालक संघटनेच्या वतीने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन.

- Advertisement -
ऑटो रिक्षाचे फिटनेस व इन्शुरन्स लॉकडॉउन काळात थकलेले आहे त्या रिक्षांवर दंड आकारला जाणार नाही – उप प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार.  
अहमदनगर प्रतिनिधी – वाजिद शेख

अहमदनगर जिल्ह्यातील ऑटोरिक्षा ज्या अनफिट आहेत त्या गाड्यांवर कारवाई करण्यासाठी मुदत वाढ मिळण्याच्या मागणीसाठी अहमदनगर जिल्हा ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक मालक संघटनेच्या वतीने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांना निवेदन देताना संघटनेचे अध्यक्ष अविनाश घुले, कार्याध्यक्ष कॉ.बाबा आरगडे, उपाध्यक्ष दत्ता वामन, सरचिटणीस अशोक औशिकर, सहचिटणीस लतीफ शेख, प्रमुख सल्लागार विलास कराळे, गणेश आटोळे, सागर बिडकर, आकिब खान, गवतेश नागुलपिल्ली, सतीश भोबाळ, दत्ता गटी, सोमनाथ बहिरवाडे, आकीब सय्यद, राजू शेख, अमिन शेख, अल्तमश शेख आदी सर्व रिक्षा चालक उपस्थित होते.

देशामध्ये व राज्य मध्ये कोरोणा महामारी मुळे रिक्षाचालकांचे दोन वर्षापासून व्यवसाय ठप्प झाले होते शहराची कार्यक्षेत्र कमी असल्यामुळे व नगरमध्ये मोठे उद्योग नसल्यामुळे लोकसंख्येच्या आधारावर परवाने न देता जास्त परवाने दिले असल्यामुळे रिक्षाचालकांचे व्यवसाय होत नाहीत आत्ताच कुठे थोडेफार व्यवसाय चालू झालेले असून आज रिक्षाचालकांना आपले कुटुंब चालवणे मुश्कील झाले आहे असे असताना देखिल देशातील महामारीचा विचार करता व्यवसाय डबघाईत आल्याचा विचार करता? फायनान्स कंपनीचे हप्ते भरणे या सर्वांचा विचार करता रिक्षाचालकांना रिक्षा क्लिअर करण्यासाठी मुदत वाढ देण्याची मागणी करण्यात आली होती त्याआधारे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार म्हणाले की ज्या रिक्षावाल्यांचे लॉकडाऊन काळात फिटनेस इन्शुरन्स थकलेले आहेत त्यांना दंड आकारता येणार नसून मुदतवाढ देण्यात येणार आहे व ज्यांचे लॉकडाउनच्या आधीपासून फिटनेस व इन्शुरन्स थकलेले आहे अशा रिक्षांवरती कारवाई करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले व रिक्षाचालकांनी रिक्षा चालवताना बॅच बिल्ला, लायसन, परमिट व आपला ड्रेस आवश्यक असणार असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार म्हणाले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles