पक्ष कार्यालय येथे राष्ट्रवादी परिवार संवाद.
अहमदनगर प्रतिनिधी – वाजिद शेख
राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेनिमित्त राष्ट्रवादी भवन येथे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या आढावा बैठकित अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी व सर्व सेलच्या पदाधिकार्यांनी केलेल्या कार्याचा लेखाजोखा मांडला.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादीच्या माध्यमातून सुरु असलेल्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले.जिल्हा राष्ट्रवादीच्या बैठकित राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा जिल्ह्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी स्वागत केले.
यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र फाळके समवेत पक्षनिरीक्षक अंकुश काकडे, युवक प्रदेशाध्यक्ष महबूब शेख, महिला प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर, आमदार अरुणकाका जगताप, आमदार संग्राम जगताप, आमदार किरण लहामटे, जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले, दादाभाऊ कळमकर, नरेंद्र घुले, संदीप वर्पे, संजय कोळगे, कपिल पवार, गजेंद्र भांडवलकर, किसनराव लोटके, पांडुरंग अभंग आदि उपस्थित होते.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांचे जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या माध्यमातून सुरु असलेल्या कार्याची माहिती दिली. तसेच सर्व सेलच्या अध्यक्षांनी आपल्या कार्याचा अहवाल सादर केला.
जयंत पाटील यांनी पदाधिकार्यांशी संवाद साधताना पक्ष बळकट करण्यासाठी सर्वच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सक्रीय होण्याची गरज आहे.जिल्ह्यात राष्ट्रवादीचे कार्य उत्तमपणे सुरु असून,पक्षाची ध्येय-धोरणे सर्व सामान्यांपर्यंत घेऊन जाण्याचे स्पष्ट केले. तर भविष्यातील निवडणुका समोर ठेऊन कामाला लागण्याचे आवाहन केले.