अ.नगर मनपा कै. बाळासाहेब देशपांडे रुग्णालयातील डॉक्टरांचा राष्ट्रीय डॉक्टर डेनिमित्त सत्कार संपन्न
अपुऱ्या आरोग्य सुविधेतही देशपांडे दवाखान्याने नागरिकांचा विश्वास संपादन केला – उपायुक्त डॉ. विजयकुमार मुंडे
नगर : धकाधकीच्या युगात मनुष्यावर आरोग्याबाबत कधी कोणावर कशी वेळ येईल हे सांगता येत नाही, तरी प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेत आपला परिसर स्वच्छ ठेवावा, सरकारी दवाखान्यांमध्ये अपेक्षित असणाऱ्या औषधांमध्ये रुग्णांवर उपचार केले जाते, मनपाच्या कै. बाळासाहेब देशपांडे रुग्णालयामध्ये गरजू रुग्णांना आरोग्य सेवा दिली जात आहे, अपुऱ्या आरोग्य सुविधेतही बाळासाहेब देशपांडे दवाखान्यामध्ये चांगले सेवा दिली जात असल्यामुळेच नगर जिल्ह्यातील नागरिकांचा विश्वास संपादन झाला आहे. डॉक्टरांनी कोरोना काळामध्ये आरोग्याच्या चांगल्या सुविधा देण्याचे काम केले आहे आरोग्य सेवा ही शेवटच्या घटकापर्यंत घेऊन जाण्याचे काम डॉक्टरांनी करावे असे प्रतिपादन मनपा उपायुक्त डॉ. विजयकुमार मुंडे यांनी केले.
अहमदनगर मनपाच्या कै. बाळासाहेब देशपांडे रुग्णालयात राष्ट्रीय डॉक्टर डेनिमित्त डॉक्टरांचा सत्कार संपन्न झाला, दरम्यान उपायुक्त डॉ.विजयकुमार मुंडे यांनी देशपांडे रुग्णालयाची पाहणी करत माहिती घेतली, यावेळी मनपा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजुरकर, डॉ. दिलीप बागल, प्रसिद्ध अधिकारी शशिकांत नजन, डॉ. भाग्यश्री हंबिरे, डॉ. शिल्पा पथक, डॉ. रेणुका जोशी, डॉ.दीपमाला चव्हाण, डॉ. सोनी करंडे, डॉ. प्रमोद हिरभगत आदीसह कर्मचारी उपस्थित होते.
आरोग्य अधिकारी सतीश राजुरकर म्हणाले की, केंद्र व राज्य सरकारच्या आरोग्य बाबतच्या विविध योजना मनपाच्या माध्यमातून शेवटच्या रुग्णांपर्यंत घेऊन जाण्याचे काम आम्ही करत आहोत, बाळासाहेब देशपांडे हे आपले कुटुंब आहे त्या माध्यमातून नगर जिल्ह्यातील नागरिकांची आरोग्यसेवा अनेक वर्षापासून केली जात आहे मनपाच्या माध्यमातून डॉक्टरांचा केलेल्या सन्मानाच्या माध्यमातून त्यांना प्रोत्साहन व प्रेरणा मिळेल व केलेल्या कामाचे समाधान लाभेल आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये देखील बाळासाहेब देशपांडे रुग्णालयामध्ये जिल्हाभरातील रुग्ण मोठ्या संख्येने येत आहे असे ते म्हणाले.
डॉ. दिलीप बागल म्हणाले की, डॉक्टरांना समाजामध्ये मानाचे स्थान व सन्मान आहे. कोरोना संकट काळात डॉक्टरांनी आपला जीव धोक्यात घालून आरोग्यसेवा केली आहे बीसी रॉय हे देशातील पहिले डॉक्टर आहे कै. बाळासाहेब देशपांडे रुग्णालयांनी आरोग्य सुविधेच्या माध्यमातून रुग्णांची ऋणानुबंध निर्माण केला आहे असे ते म्हणाले.
यावेळी डॉक्टर्स,नर्स यांचा पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला आहे.
- Advertisement -