आडत व्यापाऱ्याचे दहा लाख रुपये हमालांनी पळविले….

- Advertisement -

कर्जत प्रतिनिधी – गणेश जेवरे

कर्जत शहरातील प्रतिष्ठित आडत व्यापारी पियुष रविंद्र कोठारी वय २० वर्ष,हे बँकेतून दहा लाख रुपये काढून घेऊन जात असताना,त्याच्याचकडे कामाला असणाऱ्या हमाल सोमनाथ विठ्ठल साळुंके, प्रमोद विजया आतार दोघे राहणार कोरेगाव तालुका कर्जत,यांनी दुचाकीच्या हँडलला अडकवलेली बॅग चोरून नेल्याची खळबळजनक घटना घडली.

याबाबत घडलेली घटना अशी की,कर्जत येथील जुने व प्रतिष्ठित अडत व्यापारी रविंद्र कोठारी यांनी मुलगा पीयूष यास शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या मालाचे पेमेंट द्यावयाचे आहे.तर तू कर्जत शहरातील नगर अर्बन बँकेच्या शाखेमधून दहा लाख रुपये काढून आण असे सांगितले.

त्यानंतर पियुष मार्केट यार्ड मधून बाजारतळ येथे असणार्‍या नगर अर्बन बँकेच्या शाखेमध्ये पैसे काढण्यासाठी आला होता.दरम्यान पियुष यास पैसे आणण्यासाठी पाठवल्याचे त्यांच्याच अडत दुकानांमध्ये हमाली काम करत असलेल्या सोमनाथ साळुके व प्रमोद आतार यांनी ऐकले,त्यानंतर ते रविंद्र कोठारी यांना आमचे गावामध्ये काम आहे ते करून परत आलो असे म्हणून मार्केट यार्डाच्या बाहेर रस्त्यावर येऊन थांबले .

दरम्यान अर्बन बँकेमधून दहा लाख रुपये काढून बॅगमध्ये ठेवून दुचाकीवरून पियुष मार्केट यार्ड कडे येत असताना रस्त्यातच थांबलेल्या सोमनाथ साळुंके व प्रमोद आतार यांनी पियुष यास हाका मारली व गाडी थांबवण्यास सांगितले.

आपल्याच दुकानातील हमाल हाका मारत असल्यामुळे त्यांच्याजवळ पियुष थांबला व त्यावेळी सोमनाथ व प्रमोद यांनी तुमचे वडील आम्हाला फार रागवतात, त्यामुळे आम्ही आता कामाला येणार नाही असे म्हणून त्यांनी पियूषच्या दुचाकीला अडकवलेली पैशाची बॅग घेतली व दुचाकीवरून पळून गेले.

यानंतर पियुष याने मार्केट यार्ड मध्ये येऊन आपल्या वडिलांना ही सर्व घटना घडलेली सांगितली.

दरम्यान तात्काळ पोलीस पथक मार्केटयार्ड परिसरामध्ये आले व त्यांनी सोमनाथ विठ्ठल साळुंके व प्रमोद विजय आतार या दोघांचा शोध घेतला,मात्र ते घरी व परिसरात आढळून आले नाहीत ते दोघेही फरार झाले आहेत.

याप्रकरणी कर्जत पोलिस स्टेशनमध्ये पियुष रविंद्र कोठारी यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी सोमनाथ विठ्ठल साळुंके व प्रमोद विजय अतार या दोघांवर दहा लाख रुपयांची रोकड पळवली म्हणून भादवि कलम ३७९,३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान ही घटना समजताच मार्केट यार्ड व कर्जत शहरात खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles