अहमदनगर प्रतिनिधी – महिला सर्व क्षेत्रांमध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून बरोबरीने काम करत आहे तसेच प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या कामाचा ठसा उमटवित आहेत, महिलांनी संघटित होऊन व्यवसायाकडे वळावे सर्जेपुरा येथील ‘आदया क्रिएशन’ ने पारंपारिक पद्धतीच्या नऊवारी साड्या शिवून देण्याचा उपक्रम सुरु केला आहे.
त्यांचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे.या आधुनिक युगामध्ये आपण आपले संस्कार,परंपरा पारंपारिक पद्धतीकडे आपण वाटचाल करीत असल्याचे प्रतिपादन धनश्री सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले.
सर्जेपुरा येथील ‘आदया क्रिएशन’ साडी शिवण उद्योग समूहाचे उद्घाटन सौ.धनश्री सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी नगरसेविका सुप्रिया जाधव,कमलाबाई लांडगे,आदया क्रिएशन च्या संचालिका वैष्णवी लांडगे, राजश्री सजगुले,कमल शेळके,नमिता आडेप,आरती लांडगे,सुमन हरबोले आदी महिला यावेळी उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना आदया क्रिएशनच्या संचालिका वैष्णवी लांडगे म्हणाल्या की,या आधुनिक युगामध्ये पारंपरिक पद्धतीला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.पारंपारिक पद्धतीच्या साड्या महिला वर्गांमध्ये पसंतीस उतरत आहेत यासाठी आदया क्रिएशनच्या माध्यमातून नऊवारी साड्या शिवून देण्याचा उपक्रम सुरु केला आहे.
हस्तकला कौशल्याने सदर साड्या बनवल्या जातात यामध्ये विविध प्रकारच्या नऊवारी साड्या तयार केल्या जातात यामध्ये पेशवाई मस्तानी,राजलक्ष्मी,शाही मस्तानी, मयूर पंखी या सर्व पारंपरिक पद्धतीच्या नऊवारी साड्या शिवून देण्याचे काम आपल्या दालनामध्ये केले जाते असे त्या म्हणाल्या.