आपल्याकडे जे जास्त आहे, ते गरजूंना देणे ही आपली संस्कृती – गोपाल मनियार

- Advertisement -

माहेश्‍वरी युवा संघटन व रामकृष्ण अर्बन क्रेडिट सोसायटी आयोजित रक्तदान शिबीरात 231 रक्त बाटल्यांचे संकलन

आपल्याकडे जे जास्त आहे, ते गरजूंना देणे ही आपली संस्कृती – गोपाल मनियार

नगर – आपल्या संस्कृतीत सण-समारंभाला फार महत्व आहे. यानिमित्त समाज एकत्र येऊन आपले सुख-दु:ख वाटून घेत असतो. महेश नवमी हा माहेश्‍वरी समाजाचा सर्वात मोठा सण-उत्सव. यानिमित्त माहेश्‍वरी युवा संघटना समाजामध्ये चांगल्या पद्धतीने काम करत आहे. त्या माध्यमातून विविध उपक्रम राबवून त्याचा लाभ मिळवून देत असल्याने समाजाला त्याचा मोठा फायदा होत आहे. आज रक्तदान शिबीराचा उपक्रम राबवून सामाजिक दायित्व जपले आहे. रक्तदानाने अनेकांचे प्राण वाचले जाऊ शकतात, यासाठी प्रत्येकाने रक्तदान करणे गरजेचे आहे. आपल्याकडे जे जास्त आहे, ते गरजूंना देणे ही आपली संस्कृती आहे. त्यानुसारच माहेश्‍वरी समाजाचे सुरु असलेले कार्य कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन रामकृष्ण अर्बन क्रेडिट सोसायटीचे चेअरमन गोपाल मणियार यांनी केले.

महेश नवमीनिमित्त माहेश्‍वरी युवा संघटन व रामकृष्ण अर्बन क्रेडिट सोसायटी यांच्यावतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी रामकृष्णचे चेअरमन गोपाल मनियार, जयप्रकाश काबरा, उद्योजक जितेंद्र बिहाणी, मधुसूदन सारडा, श्रीगोपाल धूत, लक्ष्मीकांत झंवर, किसन बंग, विश्‍वनाथ कासट, राजेंद्र मोलू, अशोक बंग, राजेंद्र कंत्रोट, मथुराबाई झंवर, अनुरिता झगडे, देवराम साठे, शशिकांत पुंडलिक, माहेश्‍वरी युवा संघटनचे अध्यक्ष शाम भुताडा, प्रोजेक्ट चेअरमन संग्राम सारडा, पियुष झंवर आदि उपस्थित होते.

यावेळी स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जयप्रकाश काबरा तर स्वागताध्यक्ष म्हणून उद्योजक जितेंद्र बिहाणी, प्रकल्प प्रमुख म्हणून गोविंदा जाखोटिया, सुमित चांडक, शेखर असावा, प्रतिक सारडा आदिंनी काम पाहिले. यावेळी आदि उपस्थित होते.

यावेळी जयप्रकाश काबरा म्हणाले, माहेश्‍वरी समाजाचे संघटन हे चांगल्या पद्धतीने सुरु असून, विद्यार्थी, युवक, नव उद्योजक, महिला, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांमुळे समाजोन्नत्तीचे काम होत आहे. सांस्कृतिक कार्यक्रमानिमित्त आपली संस्कृती, परंपरा जपण्याचे काम अशा उपक्रमातून होत आहे. समाजाला दिशा देण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी अध्यक्ष श्याम भुतडा म्हणाले, माहेश्‍वरी युवा संघटनेच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाचा विकास व्हावा, यादृष्टीने विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्यांचा लाभ अनेकांना होत आहे. युवा संघटनेच्या उपक्रमास मिळालेला प्रतिसाद आणि त्याचे फलित हे संघटनेचा आत्मविश्‍वास वाढविणारा ठरला आहे. महेश नवमीनिमित्त रक्तदान शिबीरातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. उपक्रमातून समाजाचे संघटन करुन समाजाला दिशा दिशा देण्याचे काम ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत असल्याचे सांगितले.

रक्तदान शिबीरात आनंदऋषीजी हॉस्पिटल व जनकल्याण रक्तपेढीच्या सहकार्याने रक्तसंकलनाचे कार्य करण्यात आले. या शिबीरात 231 रक्त बाटल्यांचे संकलन झाले. स्नेह मिलन कार्यक्रमासाठी माहेश्‍वरी इंजिनिअर्स, बिर्ल्डस्, बिल्डींग मटेरियल ग्रुपचे सहकार्य लाभले. गुणवंत विद्यार्थ्यांना मनिष सोमाणी यांच्यावतीने बक्षिसे देण्यात आली.

सूत्रसंचालन गोविंदा जाखोटिया व रिद्धी जाखोटिया यांनी केले. सर्व कार्यक्रमासाठी माहेश्‍वरी युवा संघटनचे पदाधिकारी विशाल झंवर, संकेत मानधने, सुमित खटोड, भुषण काबरा, अनिकेत बलदवा, पवन बिहाणी, गोविंद दरक, गोविंदा काकाणी, कुणाल लोया, मुकुंद जाखोटीया, पवन बंग, पवन बिहाणी, सिद्धार्थ झंवर, सुमित बिहाणी, योगेश सोमाणी, संकेत अट्टल, मधुर बिहाणी आदि परिश्रम घेतले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles