कर्जत प्रतिनिधी – गणेश जेवरे
कर्जत जामखेड मतदार संघाचे युवा आमदार रोहित पवार यांना मंत्रिमंडळ विस्तारामध्ये कॅबिनेट मंत्रिपद मिळणार आहे,यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव कर्जत व जामखेड तालुक्यामध्ये होत आहे.
शरद पवार यांचे नातू अशी ओळख असलेले आमदार रोहित पवार यांची राज्याच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागणार आहे अशी चर्चा सध्या कर्जत व जामखेड तालुक्यामध्ये सुरू आहे.या निमित्ताने पुन्हा एकदा या मतदारसंघाला संधी मिळणार आहे .
आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये संपूर्ण राज्य हे मतदार संघ म्हणून आपल्या कार्याचा ठसा सर्वत्र ठेवला आहे.करोना काळामध्ये त्यांनी राज्यामध्ये अतिशय चांगले काम केवळ मतदार संघ पुरते मर्यादित ठेवता राज्यभर केले. पवार कुटुंबीयांची ही ओळख न ठेवता त्यांनी स्वतःची अशी ओळख राज्यांमध्ये निर्माण केली आहे.
विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या केंद्र व राज्यातील नेत्यांना खऱ्या अर्थाने चुकीच्या मुद्द्यावर प्रखरपणे टीका करून त्यांना निरुत्तर करण्याचे काम राज्य सरकार मध्ये आमदार असलेल्या रोहित पवार यांनी अतिशय खुबीने केले आहे.
विशेष म्हणजे त्यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर केलेली टीका करताना जे कसब दाखवले आहे यावरून त्यांना उत्तर देताना भाजपचे नेते देखील संभ्रमात पडल्याची अनेक वेळा दिसून आले.
निष्ठावंतांना संधी
आमदार रोहित पवार हे पवार कुटुंबातील असले तरीदेखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत आहे.कुणीतरी उमेदवारीची तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळे आकस्मात पक्षात प्रवेश केला व आमदार झाले अशा व्यक्तीला संधी देण्यापेक्षा खऱ्या अर्थाने पक्षाशी प्रामाणिक असणाऱ्या आमदार रोहित पवार यांना भविष्यातील सर्व बाबींचा विचार करून त्यांच्या कामावर आणि पक्षनिष्ठा वरून त्यांना संधी द्यावी अशी कर्जत जामखेड तालुक्यातील सर्व नागरिकांची अपेक्षा आहे आणि सोशल मीडिया मधून देखील जिल्ह्यातील सर्वांची आमदार रोहित पवार यांना कॅबिनेट मंत्री करून नगर जिल्ह्याचे पालकमंत्री करावे अशी मागणी होत आहे.