- Advertisement -
कर्जत प्रतिनिधी – गणेश जेवरे
कर्जत येथील ग्रामदैवत संत गोदड महाराज यांनी जगत आरक हा पहिला हस्तलिखित ग्रंथ लिहिला होता, हा ग्रंथ अभ्यासासाठी व त्यांचे हस्तलिखित सर्व नागरिकांना समजावी या भाषेत त्याचे रूपांतर करण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी पुढाकार घेतला असून, हा ग्रंथ कला संवर्धन संशोधन आणि प्रशिक्षण विभाग मुंबई यांच्याकडे त्यांनी सुपूर्द केला आहे.
कर्जत येथील ग्रामदैवत व थोर संत गोदड महाराज यांनी विविध विषयांवर खूप मोठे हस्तलिखित लिहिले आहे. विपुल ग्रंथसंपदा सर्व नागरिकांच्या आणि भाविकांच्या आस्थेचा विषय आहे यामुळे ही सर्व संपदा चिरकाल टिकून राहावी याच्यावर संशोधन व्हावे आणि हे लिखाण आणि माहिती संपूर्ण जनतेला समजावी यासाठी आमदार रोहित पवार यांनी स्वतः पुढाकार घेत हे साहित्य संत गोदड महाराज मंदिराचे मानकरी , नागरिक आणि मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय यांच्या सहकार्याने हस्तलिखित ग्रंथ वस्तुसंग्रहालयाच्या कला संवर्धन संशोधन आणि प्रशिक्षण विभागाकडे सुपूर्त केला आहे.
यावर हा विभाग संशोधन करून ही सर्व ग्रंथसंपदा जतन करण्यासाठी यावर संशोधन करून काम करणार आहे
- Advertisement -