अहिल्यानगर – शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात दिलेल्या योगदानासाठी आयएमएस चे प्रा विजय शिंदे यांना “भारत भूषण पुरस्काराने” चित्रकुट इंटर नँशनल स्कूल चे प्रमुख अशोक सचदेव यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले, यावेळी संजय चव्हाण, अनुराधा राणा, पूजा गुरब्क्ष इस्रो चे रविशंकर उपस्थित होते. केंद्र शासनाच्या मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स, इस्रो, नीती आयोग व चित्रकुट इंटर नँशनल स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार सोहळा संभाजीनगर रोड वरील अक्षय पँलेस याठिकाणी आयोजित करण्यात आला होता. यावेळी शिक्षकांसाठी विविध विषयांवरील चर्चासत्रे आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना समजून घेताना त्यांचा भावनिक बुध्यांक, बौद्धिक बुध्यांक, व सामाजिक बुध्यांक यांचा योग्य समन्वय असणे किती गरजेचे आहे यावर विस्तुत चर्चा झाली.
प्रा शिंदे हे गेले २५ वर्ष आयएमएस सारख्या नामांकित व्यवस्थापन संस्थेत काम करत असून त्याद्वारे वृक्षारोपण, उद्योगानां भेटी, सामाजिक जनजागृती, वाहतूक नियमनाचे उपक्रम, पारगाव येथील डॉ शरद कोलते इंग्लिश मिडीयम स्कूल च्या माध्यमातून ग्रामीण विकासात योगदान असे बहुविध काम करत असल्यामुळेच त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली.
पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे संचालक डॉ एम बी मेहता, उपसंचालक डॉ विक्रम बार्नबस, विभाग प्रमुख डॉ प्रोनोती तेलोरे, ग्रंथालय प्रमुख डॉ स्वाती बार्नबस, निवृत्त सरसंचालक डॉ शरद कोलते, निवृत्त महसूल अधिकारी शिवाजी टेमकर यांनी अभिनंदन केले आहे. या पुरस्काराचे श्रेय आयएमएस संस्था तसेच कुटुंबीय वैशाली शिंदे व मुली वेदिका आणि विधी शिंदे यांचे देखील आहे असे मत प्रा शिंदे यांनी व्यक्त केले.