अहमदनगर प्रतिनिधी – जिल्हा शासकीय रुग्णालयात लागलेल्या आगीला जवळपास पंधरा दिवस उलटून गेले तरी सुध्दा अजून चौकशी चालू आहे.परंतु यामध्ये नाहक डॉ.विशाखा शिंदे सपना पठारे, अस्मा शेख, चांन्ना अनंत या चार जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
खर तर हि आग आरोग्यमंत्री राजेश टोपे तसेच सिव्हील सर्जन डॉ.सुनील पोखरना यांच्या निष्क्रिय कामामुळे लागलेली आहे.भंडारा येथील लागलेल्या शासकीय रुग्णालयातील आगीत अनेक नवजात बालकांचा मृत्यू झाला.त्या घटनेनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काय बोध घेतला.महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयांमध्ये पुन्हा आग लागणार नाही या विषयी काय काळजी घेतली.
त्यानंतर फक्त शासकीय रुग्णालयात फायर ऑडिट करण्याचा महाराष्ट्रभर आदेश दिले.परंतु आग विझविण्यासाठी लागणारी यंत्रे या ठिकाणी बसविली गेली नाही.त्याला मात्र पैसै सरकारने दिले नाही हे महत्वाचे आहे.सरकारने स्वतःचे अपशय झाकणे हे त्यांना चांगले जमते
आज डॉ.विशाखा शिंदे सह तीन नर्स या त्या ठिकाणी काम करताना हजर नव्हत्या हे पोलिस तपासात दिसुन येते.त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला.पण एखादी भंडारा सारख्या ठिकाणी घटना होऊन देखील आरोग्यमंत्री व सिव्हील सर्जनला जाग येते नसेल तर या दुर्घटनेला जबाबदार देखिल हेच आहेत.
भंडारा जिल्हा शासकीय रुग्णालयात आग लागल्यानंतर मृत्यूमुखी पडलेल्या तसेच जखमी नवजात बालकांच्या नातेवाईकांना सरकारने आर्थिक मदत केली.तसेच त्यानंतर सर्व शासकीय रुग्णालयात फायर ऑडिट करुण घेण्याचे जाहिर केले.मग फायर यंत्रणा बसविण्याची कामे कोन करणार अपुऱ्या निधीमुळे ही फायर यंत्रणा बसविली गेली नाहि.त्यामुळे गोरगरीब जनतेचा नाहक बळी या सिव्हील हॉस्पिटलमध्ये गेला.
त्यामुळें डॉ. विशाखा शिंदे सह तीन नर्स वर दाखल केलेला गुन्हा मागे घ्या असे निवेदन मनसेचे नितीन भुतारे यांनी गृहमंत्री वळसे पाटील यांना मेल द्वारे पाठविले आहे.