आर्किटेक्टस् इंजनिअर्स अँड सर्व्हेअर्स असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

- Advertisement -

आर्किटेक्टस् इंजनिअर्स अँड सर्व्हेअर्स असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

अध्यक्षपदी इंजि.विजयकुमार पादिर व उपाध्यक्षपदी इंजि.नंदकुमार बेरड यांची बिनविरोध निवड

अहमदनगर प्रतिनिधी – गेल्या 33 वर्षाची परंपरा असलेली आर्किटेक्टस् इंजनिअर्स अँड सर्व्हेअर्स असोसिएशने आपल्या कामाच्या माध्यमातून समाजामध्ये स्थान निर्माण केले आहे. या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये बांधकाम व्यवसाय मध्ये नवनवीन तंत्रज्ञान उपलब्ध होत आहे, त्याची सर्व माहिती सभासदांना कळावी या दृष्टीने कार्यशाळेचे आयोजन नगर शहरामध्ये करण्यात येत आहे.याचा बरोबर सामाजिक बांधिलकीतून विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहे, याच बरोबर इंजिनिअर्स डे,बेस्ट स्ट्रक्चर अवॉर्ड,महापालिकेतील सभासदांच्या अडचणी संदर्भात पाठपुरावा,बांधकाम विश्व,वेब साईट अपडेट, सामाजिक व टेक्निकल सेमिनार यावर भर देणार असल्याचे प्रतिपादन नूतन अध्यक्ष इंजि.विजयकुमार पादिर यांनी व्यक्त केले.

आर्किटेक्टस् इंजनिअर्स अँड सर्व्हेअर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी इंजि.विजयकुमार पादिर व उपाध्यक्षपदी इंजि.नंदकुमार बेरड यांची बिनविरोध निवड झाली तसेच सचिवपदी इंजि. अन्वर शेख, खजिनदारपदी इंजि.प्रदीप तांदळे, सहसचिवपदी इंजि.राहुल पांडव आदींची निवड करण्यात आली यावेळी सदस्य इंजि.बाळासाहेब पवार,इंजि.अजित घोडके,इंजि.किरण वाघे,इंजि.ईश्वर बोरा,इंजि.शेखर आंधळे,इंजि.प्रथमेश सोनवणे तसेच स्वीकृत सभासद इंजि.इक्बाल सय्यद,इंजि.संजय चांडवले आदींची निवड करण्यात आली.

यावेळी बोलताना इंजि.मा.अध्यक्ष सलीम शेख म्हणाले की,गेल्या 2 वर्षी मध्ये सभासदांच्या हिताचे निर्णय घेण्यात आले आहे. कोरोनाच्या दोन वर्षाच्या कार्यकाल काम करण्याची संधी मला सभासदांनी दिली,ती मी प्रामाणिकपणे पार पडली नवनवीन इंजिनियर सभासदांना बांधकाम क्षेत्राची अचूक माहिती व्हावी यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहे.आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून बांधकाम व्यवसायाची माहिती सर्व सभासदांना देण्याचे काम केले आहे.बांधकाम व्यवसायातील सर्वांना एकत्रित करण्यासाठी बांधकाम विश्व डायरी बनविण्याचे काम सुरू असून नवीन संचालक मंडळाने हे काम पूर्ण करावे असे ते म्हणाले.

संजोग लॉन येथे झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सर्व विषय सभासदांनी एक मुखाने मंजूर केले.सभेतील चर्चेत रत्नाकर कुलकर्णी, अनिल मुरकुटे, अशोक सातकर, जवाहर मुथा, मकरंद देशपांडे, वसीम सय्यद, बाबूजी ससाणे, संजय पवार, मनोज जाधव, अजित माने, अजय दगडे, विशारद पेटकर, रमेश कारले, अशोक भोसले सुरेन्द्र धर्माधिकारी, सुनिल जाधव, अनिल धोकरीया, दिपक मुथा,वैभव फिरोदिया आदींनी भाग घेतला. नूतन 34 सभासदांचा मेम्बरशीप सर्टिफिकेट देऊन सत्कार करण्यात आला तसेच अविनाश कुलकर्णी यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले.

ऐसा भवन बांधकाम समितीच्या नूतन अध्यक्ष पदी आर्कि.मीनल काळे यांची निवड करण्यात आली त्यांनी सर्व सभासदाना ऐसा भवन कामासाठी सहकार्य करून काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आवाहन केले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles