कर्जत प्रतिनिधी – गणेश जेवरे
कर्जत येथील पहिल्या आर आर पी (रोहित राजेंद्र पवार) चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये युनायटेड धांडेवाडी हा संघ ठरला चॅम्पियन.
आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कर्जत येथे योगीराज शेलार व आशुतोष देशमाने यांच्यासह युवकांनी एकत्र येत आर आर पी (रोहित राजेंद्र पवार) चषक क्रिकेट स्पर्धा भरवली या स्पर्धेमध्ये अंतिम सामना मोठा चुरशीचा झाला.
यामध्ये तालुक्यातील युनायटेड धांडेवाडी क्रिकेट संघ हा विजेता ठरला त्यांनी अंतिम सामन्यांमध्ये राजमुद्रा क्रिकेट क्लब भैरोबा वाडी या संघाचा पराभव केला.अंतिम सामन्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट स्टेडियम येथे मोठी गर्दी झाली होती.
या सामन्यासाठी आमदार रोहित पवार हे स्वतः उपस्थित राहिले होते.या स्पर्धेत मध्ये एकूण ३५ संघांनी सहभाग घेतला होता सहा दिवस ही स्पर्धा चालली कर्जत येथील रोहित शिंदे क्रिकेट क्लब यांनी तिसरा आता राशिन क्रिकेट क्लब यांनी चौथा क्रमांक पटकावला.
कर्जत येथील शरद पवार चषक स्पर्धा
यावेळी बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले की, योगीराज शेलार आशुतोष देशमाने व रोहन ढेरे यांच्यासह युवकांनी माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित केलेली क्रिकेट स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडल्या आहेत.
डिसेंबर महिन्यामध्ये कर्जत येथे शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या नावाने नगर जिल्ह्यातील सर्व संघांसाठी क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात येईल असे यावेळी रोहित पवार यांनी जाहीर केले,
कोणतीही स्पर्धा भरवणे आणि ती यशस्वी रित्या पार पडणे तेवढे सोपे काम नसत.परंतु या युवकांनी या ठिकाणी चांगला प्रयत्न केला याबद्दल यांचे मी विशेष कौतुक करतो असे श्री पवार म्हणाले.
यावेळी विजेत्या संघांचे याचबरोबर सहभागी सर्व संघाचे त्यांनी कौतुक करताना क्रिकेट शौकिनांनी उस्फूर्त प्रतिसाद या स्पर्धेत दिल्याबद्दल त्यांचेही आभार मानले.
विजेत्या संघाला सुनील शेलार यांनी दिलेला भव्य चषक आमदार रोहित पवार यांच्या हस्ते देण्यात आला.यावेळी उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू उत्कृष्ट बोल उत्कृष्ट संघ यासह विविध बक्षिसे देण्यात आली.
ही स्पर्धा यशस्वीरित्या होण्यासाठी अमित तोरडमल, प्रसाद ढोकरी कर, महेश तनपुरे, नितीन धांडे, दादासाहेब थोरात, सुनील शेलार, विशाल मेहेत्रे शंकर नेवसे अभय बोरा , सुजित घोरपडी अतुल धांडे सुजित परदेशी हर्षदीप सोनवणे यांच्यासह मित्र परिवार यांचे मोलाचे योगदान मिळाले, आभार योगीराज शेलार यांनी मानले.