कर्जत प्रतिनिधी – गणेश जेवरे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तालुक्यातील कोरेगाव येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटन रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार यांच्या हस्ते झाले.
यावेळी ज्येष्ठ नेते शिवाजीराव फाळके सभापती दिलीप जाधव उपसभापती राजेंद्र गुंड प्रवीण घुले,राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष नितीन धांडे, शहराध्यक्ष सूनील शेलार, विषाल मेहेत्रे,सरपंच काकासाहेब शेळके,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष किरण पावणे,ऋषिकेश धांडे,श्रीमंत शेळके,श्री फाळके यांच्यासह अनेक जन उपस्थित होते.
राष्ट्रवादी युवक काँग्रेस यांच्यावतीने कर्जत तालुक्यामध्ये आमदार रोहित पवार यांचा वाढदिवस तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती गणांमध्ये रक्तदान शिबिर घेऊन रक्तदान करण्याचा संकल्प करण्यात आला असून किमान चार हजार पेक्षा जास्त रक्त बाटल्या संकलित करून त्या द्यावयाच्या आहेत असा निर्णय सर्व युवकांनी घेतला आहे अशी माहिती युवकचे तालुकाध्यक्ष नितीन धांडे यांनी दिली.
तालुक्यात ठिकठिकाणी होणाऱ्या रक्तदान शिबिरास मोठ्या प्रमाणामध्ये युवक नागरिक शेतकरी महिला या सहभागी होत असून आतापर्यंत अडीच हजार रक्त बाटल्यांचे संकलन झाले आहे.
कोरेगाव येथील रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बारामती ॲग्रो चे अध्यक्ष राजेंद्र पवार हे उपस्थित होते. त्यांनी या रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.