जामखेड प्रतिनिधी – नासीर पठाण
मंदीर किंवा धार्मिक स्थळ येथे प्रेरणा मिळते कोरोनाची पहिली लाट ओसरल्या नंतर मंदीर काही काळ उघडले व दुसऱ्या लाटेत पुन्हा ती बंद करावी लागली आता दुसरी लाट ब-यापैकी ओसरली असल्याने नवरात्रीच्या पहिल्या दिवशी राज्यातील सर्व धार्मिक स्थळे उघडत आहे त्यामुळे आनंद असून वेगळे वातावरण आजच्या दिवशी आहे.नवरात्रीच्या शुभेच्छा देऊन लोकांनी जास्तीत जास्त लसीकरण करून सुरक्षितता बाळगावी असे आवाहन आमदार रोहित पवार यांनी केले.
तालुक्यातील चोंडी येथे अहिल्यादेवी मंदीर उघडल्यानंतर आ.रोहीत पवार यांनी पुजा केली यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते ते पुढे म्हणाले,जिल्हा परिषद व पंचायत समितीचा निवडणूक लागला व त्यात महाविकास आघाडी सरकारला यश मिळाले व दुसऱ्याच दिवशी अशा पध्दतीने रेड केले जातात.
ह्यामध्ये कालच्या निवडणूकीचा रिझल्ट आणि या रेडचे काही रिलेशन आहे का हे पहावे लागेल पण जर राजकीय हेतूने अशा गोष्टी होत असतील तर लोकांना याचा कंटाळा आला आहे.या रेडच्या बाबतीत व या विषयाच्या अजून खोलात जाऊन माहिती घ्यावी लागेल पण अशा पध्दतीने वागणूक योग्य नाही असे माझे व सर्वसामान्य लोकांचे म्हणणे आहे.
उत्तर प्रदेशमध्ये शेतकऱ्यांना चिरडण्याचा प्रयत्न होऊन व सात जणांचा मृत्यू झाला ही घटना असंवैधनीक आहे. शेतकरी हा शेतकरी असतो तो महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरातचा असो की बिहारचा जेंव्हा आपण एका मंदिरामध्ये नतमस्तक होतो तो तालुक्यातील असो की बाहेरचा त्याचप्रमाणे शेतकऱ्याला वागणूक असावी उत्तर प्रदेश येथील घटना निषेधार्थ असून शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना तेथे अशी वागणूक मिळत असेल तर त्याला विरोध म्हणून महाविकास आघाडी सरकार मधील सर्व पक्षातील नेत्यांनी एकत्र येऊन ११ तारखेला बंद पुकारला आहे.
तेथे असणाऱ्या शेतकरी त्यांचे मुले, मुली व शेतीशी निगडित असलेले लोक प्रतिसाद देतील त्यात कोणते राजकारण न समजता फक्त आपल्या युपीतील शेतकऱ्यावर झालेल्या हल्ल्याचा विरोध म्हणून बंद पुकारला आहे त्याला मोठा प्रतिसाद मिळेल अशी आशा व्यक्त केली.
यावेळी प्रा मधुकर अबा राळेभात, दत्तात्रय वारे, सुर्यकांत मोरे,अक्षय शिंदे,सरपंच सुनिल उबाळे,प्रविण उगले,गणेश उबाळे सह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.