श्रीगोंदा प्रतिनिधी – गणेश जेवरे
शिरूर येथील रहिवासी असलेले इंजि आदित्य चोपडा यांचा काल नवलेवाडी ता-पारनेर येथे मृतदेह आढळल्याने सगळीकडे खळबळ उडाली आहे.
इंजि आदित्य चोपडा हा मागील काही दिवसांपासून पारनेर तालुक्यातील अनेक गावात सरकारी कामे करत होता.सिव्हिल इंजिनियरिंग केल्याने ग्रामपंचायत जिल्हा परिषद स्तरावरील सरकारी कामे चांगली केल्याने त्याचा लौकिक वाढला होता.त्यातून अनेक गावातील कामे मिळायला सुरुवात झाली होती.म्हणून व्यवसायिक स्पर्धा वाढत चालली होती त्यामुळे आदित्य चोपडा यांची हत्या झाल्याचा संशय आहे.
आदित्य चोपडा हा पारनेर तालुक्यातील नारायण गव्हाण या गावचा तरुण असून त्याचा मृतदेह नवलेवाडी शिवारात विहिरीत आढळला आहे.
नवलेवाडी ही सूपा पोलीस स्टेशन च्या हद्दीत असून या गुन्ह्याच्या बाबतीत योग्य तपास झाला नाही असा आरोप कुटुंबाने केलेला असून सुपा पोलीस निरीक्षक गोकावे यांनी योग्य दिशेने तपास केलेला नाही त्यामुळे त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
तसेच तातडीने तपास न झाल्यास लवकरच आंदोलनात्मक भूमिका घेण्यात येईल असे देखील स्पष्ट करण्यात आले.
यावेळी सतीश बोरा (अध्यक्ष) व्यापारी संघटना,बाळासाहेब नाहाटा(माजीसभापती),टिळक भोस(जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड),महावीर पटवा(नगरसेवक), समीर बोरा(नगरसेवक),वैभव मेथा, राहुल कोठारी,सुवेंद्र गांधी,सुभाष मुनोत,दीपक भंडारी, गौरव पोखरणा, नमन भंडारी,मयुर बोरा, निलेश मेहेर हे सर्व व्यापारी व इतर नागरिक पदाधिकारी उपस्थित होते.