अहमदनगर प्रतिनिधी : विक्रम लोखंडे
मास मार्केट ब्रँड दरम्यान विक्री पश्चात सेवा सर्व्हेमध्ये ग्राहकांची प्रथम संमती मिळवणार्या ह्युंदाई कंपनीचे अधिकृत डीलर इलाक्षी ह्युंदाई येथे नवीन न्यू व्हेन्यू गाडीचे शानदार समारंभात लॉंचींग करण्यात आले. उप प्रादेशिक परिवहन अधिकारी मिथुन पाटील, नगरसेवक मनोज कोतकर, विजयकुमार गडाख, जनरल मॅनेजर राजू बेजमगवार यावेळी उपस्थित होते.
सदर गाडीमध्ये अत्यंत वाजवी दारात ग्राहकांना ह्या सेगमेंट मध्ये अशा उत्कृष्ट सुविधांचा लाभ मिळणार आहे, ज्या सुविधा इतर कंपन्यांच्या गाड्यांमध्ये उपलब्ध नाहीत.
यात 10.25 इंची टच स्क्रीन ए व्ही एन, स्मार्ट फोन कनेक्टिव्हीटी (अँपल कार प्ले, अँनरॉईड ऑटो व मीरर लिंक ), व्हाईस रेकगनिशन / अलेक्सा, मायक्रो अँटिना, रइर एसी व्हेंट, सुपीरइर एसी परफॉर्मन्स ( 135 सीसी कॉम्प्रेसर ), इम्पॅक्ट सेन्सिंग ऑटो डोअर अन लॉक, रइर पार्किंग कॅमेरा, ऍडव्हान्स ब्लू लिंक, ईको कोटिंग टेक्नॉलॉजी, 4 सिलेंडर इंजिन /डिझेल 1.5 लि./पेट्रोल 1.2 लि./1.0 लि. पेट्रोल टर्बो इंजिन, 3 वर्षे / अनलिमिटेड किलोमीटर, 3 वर्षे फ्री रोड असिस्टंट, लो कॉस्ट ऑफ मेन्टेनन्स, सहा एअर बॅग.
सदर गाडीमध्ये 1.0 लि., 1.2 ली, 1.5 लि. मॅन्युअल व 7 स्पीड डीसीटी ट्रान्समिशनसह इंजिन पर्याय उपलब्ध आहेत. सदर गाडीमध्ये स्पर्धात्मक कंपन्यांच्या तुलनेत जास्त सुविधा उपलब्ध आहेत. सदर गाडी पेट्रोल मॅन्युअल 5 व्हेरिएन्ट व दोन व्हेरिएन्ट मध्ये तसेच सहा आकर्षक रंगात उपलब्ध होणार आहे.
सदर पेट्रोल मॅन्युअल व्हेरिएन्ट गाडीची एक्स शोरूम किंमत रु 7.53 लाख ते 10.84 लाख दरम्यान आहे. आकर्षक एक्सचेंज ऑफर तसेच नामांकित बँकेचे फायनान्स उपलब्ध आहे, अशी माहिती सेल्स मॅनेजर अजय मगर यांनी दिली.
सदर गाडी ईलाक्षी ह्युंदाई अहमदनगर येथे डेमो व टेस्ट ड्राईव्ह साठी उपलब्ध असून जास्तीत जास्त ग्राहकांनी शोरूमला भेट देऊन संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन ईलाक्षी ह्युंदाईचे जनरल मॅनेजर श्री. राजू बेजगमवार यांनी केले आहे.