केंद्राच्या योजना तळगाळापर्यंत पोहचविण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते कटीबद्ध – भैय्या गंधे
अहमदनगर प्रतिनिधी – देशातील मोठ्या प्रमाणावर असलेल्या असंघटीत क्षेत्रातील कामगारांना मुख्य प्रवाहात आणणे आणि त्यांना केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारने ‘ई-श्रम पोर्टल’ सुरु केलं आहे. विशेषत: कोरोना काळात असंघटीत क्षेत्रातील कामगारांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले.भविष्यात त्यांना अशा प्रकारे पुन्हा अडचणींना सामोरं जावं लागू नये यासाठी केंद्र सरकारने हे पाऊल उचललं आहे. लाभार्थ्यांपर्यंत ही योजना पोहचविण्याचे काम भाजपचे कार्यकर्ते करत आहे. अशा विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी भाजपाचे कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. केंद्र सरकारच्या योजना तळगाळापर्यंत पोहचविण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते कटीबद्ध आहेत, असे प्रतिपादन भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांनी केले.
भिंगार भाजपाच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ई-श्रम कार्डच्या नोंदणी व कार्ड वितरणाचा शुभारंभ शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी भिंगार शहराध्यक्ष वसंत राठोड, युवा मोर्चाचे अध्यक्ष किशोर कटोरे, अॅड.विवेक नाईक, तुषार पोटे, महेश तवले, बाळासाहेब गायकवाड, राजू मंगलाराप, लक्ष्मीकांत तिवारी, विशाल साबळे, सचिन दरेकर, ज्योत्स्ना मुंगी, वैशाली कटोरे, अनंत रासने, आनंद बोथरा, सचिन फिरोदिया, बाळू नागपुरे, कमलेश धर्माधिकारी, राकेश भाकरे, सौरभ रासने, गौतम बनसोडे, गोरख दळवी, कडूस, ज्ञानेश्वर खटावकर, बेद्रे आदि उपस्थित होते.
याप्रसंगी वसंत राठोड म्हणाले, केंद्र सरकरच्यावतीने सर्वसामान्यांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांची माहिती सर्वच नागरिकांपर्यत पोहचत नाही. त्यामुळे भाजपाच्यावतीने या योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहचवून त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी असे उपक्रम राबविण्यात येत आहे.ही योजना असंघटीत कामगारांसाठी असून, प्रकियाही सोपी असून, ‘ई-श्रम पोर्टल’वर नोंदणी केल्यानंतर सरकारच्या सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ संबंधितांना मिळणार आहे. तसेच दोन लाख रुपयांचा विमा कवचही मिळणार आहे. त्यामुळे असंघटीत क्षेत्रातील जास्तीत जास्त कामगारांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
याप्रसंगी किशोर कटोरे यांनी या योजनेची माहिती समजून सांगितली, त्याचप्रमाणे विविध ठिकाणी ही नोंदणी करण्यात येणार असल्याचे सांगितले.शेवटी ज्योत्स्ना मुंगी यांनी आभार मानले.