168 भूखंड वाटपाचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करू
एमआयडीसी मध्ये 100 बेडचे सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल उभारणार – राज्यमंत्री आदिती तटकरे
औद्योगिक वीजदर लवकरच कमी करू
अहमदनगर प्रतिनिधी – नगर एमआयडीसीही खूप वर्षापूर्वीची आहे. तिच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत नगर एमआयडीसी मध्ये लवकरच 100 बेडचे सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल होणार आहे यासाठी राज्यातील एमआयडीसीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविला तो लवकरच मंजूर होईल,एमआयडीसी मधील 168 भूखंड वाटपाचा प्रश्न न्यायप्रविष्ट असून यासंदर्भात मुंबई येथे बैठक बोलावून दोनी बाजूचे प्रश्न समजावून घेऊ व मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करू तसेच इतर राज्य उद्योगधंद्यांसाठी वीज दरवाढीत कपात देत असल्याने उद्योग त्या-त्या राज्यात जात आहे महाराष्ट्र सरकारही वीज दरवाढीबाबत कपात करणार आहे.कोरोणाच्या संकटामुळे हा प्रश्न लांबणीवर पडला होता आत तो लवकरच मार्गी लागेल व नगर एमआयडीसीला चांगले दिवस येतील असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केला तसेच नगर शहरात जवळील एमआयडीसीचा विस्तारीकरणा बरोबरच औद्योगिक क्षेत्रातील विविध अडीअडचणी सोडविण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे.
आ.संग्राम जगताप हे नगर एमआयडीसीतील औद्योगिक प्रश्न आमच्याकडे घेऊन येत असतात ते सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत असे प्रतिपादन उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र नगर एमआयडीसी 3 महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अंड ऍग्रिकल्चरच्या वतीने औद्योगिक क्षेत्रातील सुविधा व अडीअडचणी संदर्भातील आयोजित बैठकीत बोलताना उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे,समवेत आ.संग्राम जगताप, औद्योगिक संस्थेचे व्हाईस चेअरमन प्रकाश गांधी,राजेश पेवाल, दिलीप अकोलकर,संजय बंदिष्टी, संतोष लांडे, योगेश गलांडे,प्रा.माणिकराव विधाते,मनपा विरोधी पक्षनेता संपत बारस्कर,नगरसेवक कुमारसिंह वाकळे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार संग्राम जगताप म्हणाले की एमआयडीसीचा कोंडलेला श्वास मोकळा करणार आहे. आपल्या सर्वांना मिळून सकारात्मक काम करायचे आहे,उद्योजकांवर लाखो कामगार अवलंबून असतात. स्थानिक पातळीवर ज्या अडचणी असतात ते आम्ही सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहोत, एमआयडीसीचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहे. नगर मध्ये अनेक कंपन्या येऊन पाहत आहे त्यासाठी विस्तारीकरणाचा प्रश्न हाती सर्वांना बरोबर घेऊन सोडू असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी बोलताना प्रकाश गांधी यांनी एमआयडीसीमधील विविध अडी-अडचणी संदर्भात प्रश्न मांडताना सांगितले की, एमआयडीसीतील उद्योजकांना ग्रामपंचायत टॅक्स व एमआयडीसी टॅक्स अशी दुहेरी कर आकारली जाते. एमआयडीसीकडून उद्योजकांना सुख-सुविधा दिल्या जातात परंतु ग्रामपंचायतीकडून कुठल्याही सुख-सुविधा दिल्या जात नाही तरी ग्रामपंचायतीचा कर कमी करावा नगर-मनमाड हायवे रस्त्याचे रुंदीकरण करणे आवश्यक आहे. क्षेत्रामध्ये अहमदनगर मधील सुपा तसेच इतर औद्योगिक क्षेत्रांमध्ये जमीन अधिग्रहित होणे गरजेचे आहे. याचबरोबर मोठे उद्योग येण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे अशी नगर एमआयडीसी उद्योजकांची मागणी आहे.कोरोणाच्या काळात बहुतेक उद्योजक हे मृत्युमुखी पडले आहेत, त्यामुळे उद्योग क्षेत्रावर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. उद्योग सुरू राहतील यासाठी शासनाकडून सहकार्य मिळावे तसेच महावितरणकडून उद्योग क्षेत्रावर वीज बिलाचा भार टाकून आकारणी केली जाते,औद्योगिक क्षेत्रात काम करणारे मोठे,माध्यम व लघुउद्योजक हे वाढीव वीज दरामुळे नाराज झाले आहे.कोरोणाच्या संकटामुळे लॉकडाऊन काळात उद्योगधंदे बंद असल्यामुळे उद्योजक मोठ्या अडचणीत सापडला आहे, यातच महावितरणकडून मोठ्या प्रमाणात अंदाजे बिलाची आकारणी केली जात आहे तरी वीज दरामध्ये सवलत मिळावी अशा विविध मागण्या उद्योग राज्यमंत्री अदिती तटकरे यांच्यासमोर उद्योजकांनी मांडल्या.