उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या लाडकी बहीण योजनेच्या घोषणेनंतर तलाठी कार्यालय परिसरात महिलांची मोठी गर्दी
शहरातील तलाठी कार्यालयांमध्ये तलाठ्यांनी पूर्णवेळ उपस्थित राहावे – संपत बारस्कर
नगर : राज्यात महायुतीचे सरकार असून पावसाळी अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण या योजनेबरोबर विविध योजनांच्या घोषणा करण्यात आल्यामुळे नगर शहरातील सर्वच तलाठी कार्यालयावर कागदपत्र गोळा करण्यासाठी नागरिकांची व महिलांची मोठी गर्दी होत आहे. तरी त्यांना तातडीने कागदपत्र मिळावे. यासाठी तलाठ्यांनी पूर्ण वेळ आपल्या कार्यालयामध्ये उपस्थित राहून नागरिकांना तातडीने दाखले द्यावेत, लाडकी बहीण या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा दीड हजार रुपये अनुदान मिळणार आहे, यासाठी महिला मोठ्या संख्येने तलाठी कार्यालयामध्ये उपस्थित राहत आहे. तरी त्यांची अडवणूक होऊ नये.
यासाठी महसूल विभागाने सहकार्य करावे , महिलांसाठी तलाठी कार्यालयात पाण्याची तसेच बसण्याची व्यवस्था करावी. तसेच प्रभारी तलाठी कार्यभार असणाऱ्या ठिकाणी पूर्णवेळ तलाठी द्यावा, सावेडीतील तलाठी कार्यालयात जाऊन नागरिकांना तातडीने दाखले उपलब्ध करून देण्यात यावे . अशी मागणी तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली. असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी केली.