एस.टी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा;वंचीत बहुजन आघाडीच्यावतीने जामखेड तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा

- Advertisement -

अधिकार भीक मागून नाही,तर लढून मिळतात – अँड.डॉ.अरुण जाधव

 

जामखेड प्रतिनिधी – नासीर पठाण

राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न गत अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत.या मागण्यांच्या पूर्ततेसाठी एसटीतील कर्मचाऱ्यांनी राज्यभर आंदोलनाची हाक दिलेली आहे.

या आंदोलनाला पाठिंबा म्हणून  दि.१७ रोजी वंचीत बहुजन आघाडी जामखेड तालुक्याच्या वतीने वंचीत बहुजन आघाडीचे भटके- विमुक्त आघाडीचे राज्यसमन्वयक अँड.डॉ.अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली जामखेड तहसील कार्यलयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

या मोर्चामध्ये एसटी कर्मचारी आपल्या कुटुंबाना घेऊन सहभागी झाले होते, यावेळी सरकारी दुरावस्थेमुळे आत्महत्या केलेल्या एस टी च्या कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. एसटी चे शासनात विलीनीकरण नाही झाले तर पुढचा मोर्चा हा शरद पवार यांच्या घरावर काढण्यात येईल असा इशारा यावेळी जाधव यांनी दिला.

यावेळी मनोगतात अँड.डॉ.अरुण जाधव यांनी,महिनाभर काम करूनही कामगारांना वेतन वेळेवर दिले जात नाही. यामुळे एसटीचे कर्मचारी अडचणीत आले आहेत. कामगार करारानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना दिलेले फायदे वेळेवर मिळत नाहीत.यामुळे एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी गेल्या १५ दिवसांपासून संपाचे हत्त्यार उपसले आहे.

सरकारी अनास्थेमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या ३७ कर्मचाऱ्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले आहे.३०६ कर्मचाऱ्यांना कोरोना काळात जीव गमवावा लागला. यानंतरही कर्मचारी अहोरात्र काम करीत आहेत.त्यामुळे शासनाने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या त्वरित मान्य करून एसटी महामंडळाच शासनात विलीनीकरण करून कामगारांच्या कुटुंबाची व जनतेची होणारी हेळसांड थांबबावी अस मत त्यांनी व्यक्त केलं

यावेळी लोकाधिकार आंदोलनाचे प्रवक्ते बापू ओहोळ यांनी आपल्या मनोगतात अशीच स्थिती राहिल्यास भविष्यामध्ये अनेक रा.प.महामंडळाचे कर्मचारी आत्महत्येचा विचार करू शकण्याची शक्यता नाकारता येत नाही.या तुटपुंज्या पगारामुळे उदरनिर्वाह चालवणे शक्य होत नसल्याने अनेकांचे संसार मोडले आहेत.तर आत्महत्यामुळे अनेक कुटुंब उघड्यावर पडले आहेत.याकरिता, रा.प.महामंडळाचे शासनात विलीनीकरण एसटी कर्मचाऱ्यांना न्याय दयावा अस मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मंगेश आजबे, आम आदमी पार्टीचे संतोष नवलाखा, मनसे चे प्रदीप टापरे, प्रहार जनशक्ती पक्षाचे जयसिंग उगले, भाजप युवा मोर्चाचे शरद कार्ले, वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी ह.भ.प गाडे महाराज, सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार गाडे आदींनी पाठिंबा देऊन आपापले मनोगत व्यक्त केले.

एसटी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाला जामखेड तालुक्यातील तेलंगशी, रत्नापुर, धनेगाव, सोनेगाव, पाटोदा, लोणी, राजुरी, डोबेवाडी, नायगाव, जवळा, खांडवी, फक्राबाद आदी ग्रामपंचायतींनी ठराव घेऊन पाठिंबा दर्शवला.

एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्यात यावे या प्रमुख मागणीचे निवेदन,कर्तव्य बजावत असताना शहिद झालेल्या कर्मचाऱ्यांच्या विधवा पत्नींच्या हस्ते जामखेडचे तहसीलदार योगेश चंद्रे यांना देण्यात आले .

जामखेडचे माजी उपसरपंच सुरेश जाधव, वंचीत बहुजन आघाडीचे जामखेड तालुका अध्यक्ष आतिष पारवे, कर्जत ता. अध्यक्ष सोमनाथ भैलुमे, जामखेड.ता. उपाध्यक्ष किशोर मोहिते, गणेश घायतडक, जिल्हाउपाध्यक्ष योगेश सदाफुले, जामखेड शहरअध्यक्ष अजिनाथ शिंदे, शहर उपाध्यक्ष सुधीर कदम, लोकधिकार आंदोलनाच्या द्वारकाताई पवार, संतोष पवार, भैया जाधव, सखुबाई शिंदे , गणपत कराळे, वैशाली मुरूमकर, सचिन ससाणे, सुदाम शेगर, अरुण डोळस, मच्छींद्र जाधव, विशाल जाधव, सचिन भिंगारदिवे,गणपत कराळे, राजू शिंदे ,संतोष चव्हाण,राकेश साळवे, किशोर जावळे, श्रावण गंगावणे ,रोहित पवार, आदी कार्यकर्त्यांनी मोर्चा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles