अहमदनगर ऐतिहासिक वस्तू संग्रहालयास स्वच्छतेसाठी व्हॅक्यूम क्लिनर भेट
श्री गोपाल रामनाथ धूत फाउंडेशन व रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शनीचा उपक्रम
ऐतिहासिक वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी सर्वांची जबाबदारी -प्रतिभाताई धूत
अहमदनगर (प्रतिनिधी)- पाचशेपेक्षा अधिक वर्षाचा इतिहास असलेल्या शहराचा ऐतिहासिक ठेवा जतन करणाऱ्या अहमदनगर ऐतिहासिक वस्तू संग्रहालय व संशोधन केंद्रास श्री गोपाल रामनाथ धूत फाउंडेशन व रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शनीच्या वतीने स्वच्छतेसाठी व्हॅक्यूम क्लिनर भेट देण्यात आले.
या कार्यक्रमाप्रसंगी रोटरीच्या अध्यक्षा देविका रेळे, प्रतिभाताई धूत, वैशाली कोलते, सविता काळे , आर्किटेक मिनल काळे, सुजाता वाबळे, संग्रहालयाचे कार्यकारी विश्वस्त डॉ. रवींद्र साताळकर, अभिरक्षक डॉ. संतोष यादव, कर्मचारी नारायण आव्हाड, आनंद कल्याण, रामदास ससे, गणेश रणसिंग, बापू मोढवे, संतोष दांगडे, कृष्णा धुमाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रतिभाताई धूत म्हणाल्या की, राज्यातील सुसज्य संग्रहालयांपैकी अहमदनगर संग्रहालय हे एक आहे. मोठा ऐतिहासिक ठेवा संग्रहालयात जतन करण्यात आला आहे. शासनाकडून अनुदान न घेता वस्तुसंग्रहालयाचे मोठे कार्य उभे राहिले आहे. या कार्याला अधिक वैभवता प्राप्त करण्यासाठी व हा ऐतिहासिक वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी सर्वांची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
रोटरीच्या अध्यक्षा देविका रेळे यांनी ऐतिहासिक वस्तू संग्रहालय अहमदनगरची वेगळी ओळख निर्माण करेल. भावी पिढीला आपल्या पूर्वजांचा इतिहास जतन करण्यात आलेल्या ठेव्यातून माहिती होणार असून, रोटरी प्रियदर्शनीच्या माध्यमातून वस्तू संग्रहालयास मदत केली जाणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
डॉ. रवींद्र साताळकर यांनी पाहुण्यांचे स्वागत करुन संग्रहालयात ऐतिहासिक वास्तू आधुनिक पद्धतीने मांडण्यात आले असून, त्या अभ्यासासाठी उपयुक्त ठरत आहे. सर्वांच्या सहकार्याने संग्राहलय सुसज्ज झाले असल्याचे स्पष्ट केले. आभार डॉ. संतोष यादव यांनी मानले.