कनक जामगांवकर याने पुणे ते पंढरपूर सायकल वारी केली पूर्ण
नगर : आषाढी एकादशी ही महाराष्ट्र राज्याचा धार्मिक उत्सव असून राज्यभरातील भाविक वारकरी आपापल्या परीने पायी दिंडी सोहळ्यात सहभागी होत मोठ्या उत्साहात आनंदात विठूरायाच्या दर्शनासाठी जात असतात, हा सोहळा भक्तिमय वातावरणात साजरा होत असतो.
एक महिन्यावर येऊन ठेपलेल्या आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर शहरातील भा. ज. पा. मध्य मंडल अध्यक्ष राहुल जामगांवकर यांचा १२ वर्षाचा मुलगा कनक जामगांवकर याने पुणे ते पंढरपूर सायकल वारी 235 कि.मी.यशस्वीरित्या पूर्ण केली. त्याने केलेल्या या प्रवासाच्या कामगिरीबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.