कर्जत प्रतिनिधी – गणेश जेवरे
कर्जत तालुक्यामध्ये एमआयडीसी बरोबरच आयटी कंपनी याव्यात यासाठी आमदार रोहित पवार यांनी पुढाकार घेतला असून या अनुषंगाने त्यांनी त्यांचे आजोबा शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये बारामती येथे आयटी कंपन्यांच्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या सोबत याबाबत चर्चा केली.
आयटी क्षेत्रातील बहुराष्ट्रीय कंपनीच्या शिष्टमंडळाने बारामतीत शरद पवार यांची भेट घेतली.यावेळी बारामती, कर्जत-जामखेड, नगर,सोलापूर, नाशिक, कोल्हापूर, नागपूर या शहरांमध्ये IT सेंटर सुरू करून त्याला प्रोत्साहन देण्यासाठी काय करता येईल, यावर चर्चा झाली.
यावेळी या शिष्टमंडळाने विद्या प्रतिष्ठान आणि ‘ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट’ला भेट देऊन विविध प्रकल्पांचीही माहिती घेतली. यामध्ये कंपनीच्या सीईओ अश्विनी यार्डी, कार्यकारी उपाध्यक्ष प्रसाद शेट्ये, उपाध्यक्ष जगदीश कुचम आणि कुमार अनुराग प्रताप यांचा समावेश होता.
विद्या प्रतिष्ठान, ‘ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट’ आणि ‘कृषी विज्ञान केंद्रा’च्या माध्यमातून शिक्षण, कृषी-तंत्रज्ञान, डेअरी आदी क्षेत्रात आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली बारामतीत सुरू असलेले विविध प्रकल्प आणि त्याचा राज्यावर होणारा परिणाम हे पाहून या शिष्टमंडळाने समाधान व्यक्त केले
- Advertisement -