अहमदनगर प्रतिनिधी –
नगर शहरातील केडगाव भागातील अथर्व नगर येथे आज कर्जाला कंटाळून पती-पत्नी सह मुलाने आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी घडल्यामुळे केडगाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असता.आत्महत्या केलेल्या मध्ये संदीप फाटक (वय ४५)किरण फाटक (वय ३२)मैथिली फाटक(वय १०) अशी त्यांची नावे असून यांच्या कडे ऐक चिठ्ठी सापडली आहे.ती पोलिसांनी हस्तगत केली आहे.
केडगाव अथर्व नगर येथे राहणारे फाटक कुटुंब यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली असल्याचे समजते.सदरची घटना आज सकाळी आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांना समजताच त्यांनी कोतवाली पोलीस स्टेशनशी संपर्क साधला.अधिक तपास कोतवाली पोलीस करत आहेत.