मुंबई प्रतिनिधी – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा २८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता मुंबईतील टिळक भवनात आयोजित केला आहे. या सोहळ्यात नूतन प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांच्यासह अन्य पदाधिकारी पदग्रहण करणार आहेत.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी मागील आठवड्यामध्ये प्रदेश काँग्रेसच्या कार्यकारिणीत नवीन पदाधिकाऱ्यांची निवड केली आहे. त्यात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाच्या प्रदेशाध्यक्षपदी सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांची निवड झाली आहे.या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा २८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता टिळक भवन येथे होत आहे.
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची उपस्थिती राहणार असून, शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.विश्वजीत कदम, अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष टी.व्ही. श्रीनिवास, अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव बी. एम. संदीप, काँग्रेसच्या अनुसुचित विभागाचे राष्ट्रीय समन्वयक तथा महाराष्ट्र प्रभारी मनोज बागरी जी यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती राहणारअसुन काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे माजी प्रदेशाध्यक्ष व प्रदेश काँग्रेस कमिटीचे विद्यमान उपाध्यक्ष श्री.विजय अंभोरे यांच्याकडून पदभार घेणार आहेत. या सोहळ्यासाठी राज्यभरातून काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
वंचितांच्या प्रश्नांना न्याय देण्याचे काम करणार-सिद्धार्थ हत्तीअंबिरे
राज्यातील मागासवर्गीय घटकातील वंचित नागरिकांचे प्रश्न सोडून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही प्रदेश काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांनी यानिमित्ताने दिली आहे. राज्यभरातील अनुसूचित जाती विभागातील नागरिकांचे अनेक प्रश्न रखडले आहेत. प्रदेशाध्यक्ष पदाच्या माध्यमातून या घटकाचे प्रश्न सोडविण्यासाठी काम करणार असल्याचे सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांनी यावेळी सांगितले.