काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या हस्ते नागपूर येथे घनश्याम शेलार यांचा सत्कार
शेलार यांना प्रदेश पातळीवर मोठी जबाबदारी देण्याची जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांनी केली मागणी
नागपूर (प्रतिनिधी) : काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे नागपूर दौऱ्यावर आले असता तेथे पक्षात नव्याने दाखल झालेले घनश्याम शेलार यांचा खरगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात जिल्हाध्यक्ष जयंत वाघ संपतराव म्हस्के यावेळी उपस्थित होते.
यावेळी घनश्याम शेलार यांचे उत्स्फूर्त स्वागत खरगे यांनी केले. घनश्याम शेलार यांच्या कार्याचा परिचय यावेळी बाळासाहेब थोरात व जयंत वाघ यांनी करून दिला. राष्ट्रवादी काँग्रेस तसेच इतर पक्षांमध्ये कार्यरत असताना घनश्याम शेलार यांनी जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश उपाध्यक्ष म्हणून जिल्हा व प्रदेश पातळीवर उल्लेखनीय असे काम केले आहे.
त्यांचा संघटनात्मक कार्याचा आवाका खूप मोठा आहे या आधारे त्यांनी नगर जिल्हा आणि प्रदेश पातळीवर कार्यकर्त्यांचा मोठा संच उभा केला आहे. संघटन कौशल्य चांगले असून वक्तृत्व प्रभावी आहे. त्यांच्या कार्याचा उपयोग आपल्याला प्रदेश पातळीवरून करून घेता येईल त्यासाठी आपण त्यांचा प्रदेश कार्यकारिणीसाठी विचार करावा आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि वक्तृत्वाचा चांगला फायदा पक्षाला करून घेता येईल. त्यासाठी त्यांना प्रदेश पातळीवर जबाबदारी द्यावी अशी विनंती जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांनी मल्लिकार्जुन खर्गे पटोले आणि थोरात यांना केली.
तीनही नेत्यांनी या मागणीचा सकारात्मक विचार करून आगामी काळात निर्णय घेऊ आणि त्यांना प्रदेश पातळीवर मोठे पद देण्यात येईल असे तत्वतः मान्य केले.
- Advertisement -