नेवासा प्रतिनिधी – काकासाहेब नरवणे
कुकान्यातील पंचवीस वर्षा पासुन राज्यमहामार्ग हायवे क्र. १४४ अतिक्रमानाच्या भोवऱ्यात होता.तर अतिक्रमण धारकांना वेळोलेली आपआपली दुकाने काढून घेण्याचे नोटीसा बांधकाम विभागाकडून देण्यात आल्या होत्या.परंतु त्या नोटीसाला न जुमानता टपरीधारक हटली नाही .
चार दिवसापासून बांधकाम विभागाने कुकाणा
येथील हायवे वरील दुतर्फा झालेली अतिक्रमन पोलीस बंदोबस्तात काढण्यास सुरवात केली.कुकाणा गाव व्यवसायाची मोठी बाजार पेठ असल्याने लोकांची गर्दी होत असते.यामुळे वाहतूक कोंडी मोठया प्रमाणात होत असल्याने वाहतुकीला अडचण निर्णान होत असल्याने बांधकाम विभागाने कुकाणा येथील अतिक्रमण काढली.
काल रात्री अकराच्या दरम्यान कुकाणा बांधकाम विभागाची भिंत अज्ञतांकडून पाडण्यात आली.
सरकारी मालमत्तेचे नुकसान झाल्याने कुकाण्यात गडबड गोंधळ निर्णाण झाला.ही माहिती मिळताच नामदार आमदार शंकरराव गडाख कुकाण्यात दाखल झाले व झालेला प्रकार पाहिला.यावेळी टपरी धारकांनी शंकरराव गडाख यांच्या भोवती गर्दी केली व आम्हाला दुकानदारी साठी काहीतरी प्रयत्न करा असे यावेळी टपरी धारक बोलत होते.
बांधकाम विभागाच्या मालमत्तेची नुकसान झाल्याने
यावर आता बांधकाम विभाग काय भूमिका घेईल यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.