कुस्ती क्षेत्राकडे युवकांनी वळावे – आ.संग्राम जगताप

- Advertisement -

उत्तर महाराष्ट्र केसरी स्पर्धेत नगरचे मल्ल ऋषिकेश लांडे यांना सुवर्णपदक

 

अहमदनगर प्रतिनिधी – नगर जिल्ह्याचा कुस्ती क्षेत्रामध्ये देशात मोठा दबदबा होता.अनेक मल्ल नगर जिल्ह्यातल्या लालमातीत घडले आहे.दिवसेंदिवस कुस्ती क्षेत्राकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे चांगले पैलवान तयार होत नाहीत यासाठी सरकारने कुस्ती क्षेत्राला पुन्हा ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी पाऊले उचलावी.

आजच्या युवकांना व्यायामाकडे व कुस्ती क्षेत्राकडे आकर्षित करण्यासाठी उपाययोजना कराव्यात.कुस्ती क्षेत्रांमध्ये आजच्या युवकांना करिअर करण्याच्या सुविधा उपलब्ध आहे यासाठी ध्येय,चिकाटी व मेहनत करून आपल्या खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करून कुस्ती क्षेत्रात आपला नाव लौकिक वाढवावा कुस्ती क्षेत्रामध्ये करिअर केल्यास सरकारच्या माध्यमातून विविध नोकऱ्यांमध्ये संधी दिली जाते.

पै.ऋषिकेश लांडे यांनी उत्तर महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये आपल्या खेळाचे प्रदर्शन करून कुस्ती क्षेत्रात ठसा उमटवला आजच्या युवकांनी त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कुस्ती क्षेत्राकडे वळावे असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.

पाथर्डी येथे पार पडलेल्या उत्तर महाराष्ट्र केसरी स्पर्धेत ८४ किलो गटामध्ये नगर मधील मल्ल ऋषिकेश लांडे यांनी सुवर्णपदक पटकावल्याने आमदार संग्राम जगताप यांनी केला त्यांचा सत्कार केला.

यावेळी संजय काका शेळके,बाळासाहेब भापकर,अशोक घोडके,बंडू शेळके,बाळासाहेब शेळके, संतोष लांडे,वैभव वाघ,राम वाघ, दत्तात्रेय ठाणगे,सागर सोनवणे,सनी शिंदे,गणेश कुलते,दादा पांडुळे आदी उपस्थित होते.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles