अहमदनगर येथे ४०७५ कोटी किंमतीच्या सहा प्रकल्पांचे भूमिपूजन आणि पाच रस्त्यांचा लोकापर्ण सोहळा संपन्न

- Advertisement -

आज अहमदनगर येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि ज्येष्ठ नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ४०७५ कोटी किंमतीच्या सहा प्रकल्पांचे भूमिपूजन आणि पाच रस्त्यांचे लोकापर्ण सोहळा पार पडला.

यावेळी गडकरी बोलताना म्हणाले सुरत- चेन्नई हा राष्ट्रीय महामार्ग नगरमधून जाणार असल्याने अहमदनगर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होणार आहे. फक्त या रस्त्यासाठी गौण खनिजासाठी रॉयल्टी महाराष्ट्र सरकारने माफ करावी. त्यासाठी लवकरच महाराष्ट्र सरकारसोबत बैठक होणार आहे.

या सोहळ्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार मंचावर उपस्थित होते.शरदचंद्र पवार यांनी यावेळी केंद्रीय मंत्री नितिनजी गडकरी यांच्या कामाचं आणि दूरदृष्टीचं तोंडभरून कौतुक केलं.तसंच,आपण रस्ते मार्गानं जास्तीत जास्त प्रवास का करतो याचं कारणही पवारांनी आज सांगितलं.नगरमधील महामार्ग भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्याला संबोधित करताना ते बोलत होते.

‘रस्ते वाहतूक ही सर्वसामान्यांसाठी महत्वाची असते, त्याला गती देण्याचे काम गडकरी करत आहेत.अन्य राज्यात रस्त्याने प्रवास करताना जेव्हा लोक भेटतात, तेव्हा ते गडकरी यांची कृपा असल्याचं सांगतात.गडकरी कामं मंजूर करताना राजकारण पाहत नाहीत, मागणी काय आहे ते पाहतात. त्यामुळं सर्व पक्षाच्या लोकांची कामे होतात. इतर कार्यक्रमाला गेलं की वर्षानुवर्षे काही बदल दिसत नाही.पण गडकरी यांच्या कार्यक्रमाला गेलं की दोन चार दिवसांत फरक दिसतो.

एखादा नेता देशाच्या उभारणीत कसं योगदान देतो हे गडकरी यांच्याकडे पाहून लक्षात येतं, अशा शब्दांत पवारांनी गडकरींच्या कामाचं कौतुक केलं.’रस्ते, पिके व विकासाची परिस्थिती पाहायला मिळते, त्यामुळं मी शक्यतो रस्त्यानं प्रवास करतो,’ असंही पवार यांनी यावेळी सांगितलं.

यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार, खा.डॉ.सुजय विखे, खा.सदाशिव लोखंडे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे,आ.संग्रामभैय्या जगताप,आ.रोहित पवार, आ.बबनराव पाचपुते,मोनिका राजळे,अंकूश काकडे, राजश्री घुले,आ.निलेश लंके, ना.आ.शिवाजीराव कर्डिले, स्नेहलता कोल्हे, राम शिंदे, आ.लहामटे, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, राजेंद्र क्षीरसागर, एस पी मनोज पाटील उपस्थित होते.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles