खा.सुजय विखे पाटील यांनी केली पाहणी
हिवाळी अधिवेशनात भुयारी मार्गाची मंजुरी आणणार – खा.सुजय विखे
अहमदनगर प्रतिनिधी – लहू दळवी
केडगाव-आरणगाव महामार्गाला जोडणारा रेल्वे क्रॉसिंग भुयारी मार्गाच्या कामासाठी या हिवाळी अधिवेशनामध्ये केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन निधी मंजूर केला जाईल तसेच रेल्वे क्रॉसिंगचा प्रश्न मार्गी लावू.
केडगाव,आरणगाव,बुरुडगाव परिसरामध्ये राहणाऱ्या नागरिकांचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे.या भागामध्ये दिवसेंदिवस मोठी लोकवसाहत निर्माण होत आहे.
जवळचा मार्ग नागरिकांना येण्या-जाण्यासाठी निर्माण व्हावा यासाठी स्थायी समितीचे मा.सभापती मनोज कोतकर आमच्या कडे पाठपुरावा करीत आहे.
आज या कामाची पाहणी करून प्रस्ताव तयार केला जाईल व केंद्र सरकारकडून लवकरच मान्यता आणू अशी माहिती खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी दिली.
केडगाव-आरणगाव-बुरुडगावला जोडणाऱ्या रेल्वे क्रॉसिंग भुयारी मार्गाच्या कामासाठीची पाहणी खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी केले.
यावेळी समवेत स्थायी समितीचे मा.सभापती मनोज कोतकर, नगरसेवक राहुल कांबळे,सामजिक कार्यकर्ते गणेश नन्नवरे,नगरसेवक स्वप्नील शिंदे,अजित कोतकर,बच्चन कोतकर तसेच केडगाव ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मनोज कोतकर म्हणाले की, सदर क्रॉसिंगच्या भुयारी मार्गाचा प्रश्न मार्गी लागणे अत्यंत गरजेचे आहे.केडगाव-आरणगाव-बुरुडगाव येथे मोठी लोकवसाहत निर्माण झाली आहे.
भुयारी मार्गाचे प्रश्न निकाली लागला तर हे तिन्ही गावे एकमेकांना जोडले जाईल व नागरिकांना दळणवळणासाठी जवळचा मार्ग निर्माण होईल,आता नागरीक रेल्वे क्रॉसींग वरूनच जीवघेणे प्रवास करत आहे.
प्रवास करीत असताना अनेक अपघात या ठिकाणी घडले आहे.त्यामुळे भुयारी मार्गाचा प्रश्न मार्गी लागणे अत्यंत गरजेचे आहे.यासाठी खा.सुजय विखे यांच्याकडे पाठपुरावा केला होता.आज प्रत्यक्षात त्यांनी स्वतःहून या कामाची पाहणी केली व लवकरच काम मार्गी लावून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.