५० टक्के फी कपात कारा;मनसेच्या नितीन भूतारे यांची मागणी.
अहमदनगर (प्रतिनिधी)- शासनाने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर ती फी कपातीला 15 टक्के कपात केली असूनती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निषेध नोंदवून शासनाने 50 टक्के फी कपात करावी अशी मागनी करण्यात आली माळीवाडा येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर मनसेचे नितीन भुतारे यांच्या नेतृत्वाखाली शासनाच्या अध्यादेशाची होळी करून निषेध नोंदवताना शहराध्यक्ष गजेन्द्र राशीनकर, परेश पुरोहित, संकेत व्यवहारे, डॉ. संतोष साळवे, गणेश मराठे, सिधु उकांडे आदी उपस्थित होते.
दिड वर्षपासूनच्या कोरोना काळात सर्व शैक्षणिक संस्था ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत. काही शाळा , कॉलेजेस वगळता इतर खासगी संस्था शाळेच्या विद्यार्थांकडून विनाकारण अवाजवी फी वसूल करत आहेत. फी न भरल्यास निकाल राखून ठेवणे व वारंवार पालकांकडे तगादा लावणे असे प्रकार शाळांकडून होताहेत. या संदर्भात पालकांनी मनसेकडे धाव घेऊन आपल्या समस्य मांडल्या. त्या नुसार मनसेच्या वतीने शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदने देऊन फी कपात विषयी पाठपुरावा करण्यात आला. या मुळे, शासनाने १५ टक्के फी कपात करण्याचा निर्णय ही सादर केला. शासनाने केलेली ही फी कपात म्हणजे जनतेची घोर फसवणूक केलीय. केवळ १५ टक्के फी कपात करून जनतेच्या तोंडाला पाने पुसली आहेत व महा विकास आघाडी सरकार मधील नेत्यांच्या शिक्षण संस्था पोसण्यासाठी हा १५% फी कपातीचा निर्णयमुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या महाविकस आघाडी सरकार ने घेतला आहे तो मनसेला मान्य नाही फी कपात ५० टके कारा अशी मागणी मनसेचे जिल्हा सचिव नितीन भुतारे यांनी केली आहे तसेच अध्यादेशाची होळी करून निषेध नोंदविण्यात आला. महात्मा ज्योतिबा फुले यांनी मोफत शिक्षणाची सोय केली असताना हे महाविकास सरकार भीक दिल्यासारखी फी कपात करतायेत असे उद्गार मनसे सचिव नितीन भुतारे यांनी केले तसेच सरकारच्या या निर्णयाचा विरोध केला. मनसे पालक व विद्यार्थी यांच्यासमवेत रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याची भावना व्यक्त केली.