कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष तथा नॅशनल को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशनचे उपाध्यक्ष सीए. मिलिंद काळे यांची अहमदनगर शहर सहकारी बँकेस सदिच्छा भेट 

कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष तथा नॅशनल को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशनचे उपाध्यक्ष सीए. मिलिंद काळे यांची अहमदनगर शहर सहकारी बँकेस सदिच्छा भेट 

शहर बँकेच्या कामकाजाचे केले कौतूक 

अहमदनगर : अहमदनगर शहर सहकारी बँक ही महाराष्ट्रातील प्रगतीशील बँकांपैकी एक असून भविष्यकाळात कॉसमॉस बँक आणि अहमदनगर शहर सहकारी बँक एकमेकांच्या सहकार्याने नागरी सहकारी बँकांसमोरील प्रश्न सोडविण्यासाठी एकदिलाने प्रयत्न करु. तसेच नागरी सहकारी बँकांच्या दृष्टीने शहर बँकेचे चेअरमन आणि अहमदनगर जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष सीए गिरीश घैसास यांनी मांडलेले मुद्दे महत्त्वाचे असून महाराष्ट्र राज्य नागरी सहकारी बँक्स फेडरेशन आणि नॅशनल फेडरेशन यांच्या माध्यमातून रिझर्व बँकेसमोर हे मुद्दे मांडू असे आश्वासन नॅशनल को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशनचे उपाध्यक्ष तथा कॉसमॉस नागरी सहकारी बँकेचे चेअरमन सीए मिलिंद काळे यांनी अहमदनगर शहर सहकारी बँकेच्या सदिच्छा भेटीप्रसंगी दिले.
शहर बँकेच्या संचालक मंडळ सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास कॉसमॉस बँकेचे उपाध्यक्ष सीए. यशवंत कासार, सीए. ज्ञानेश्वर काळे आदि मान्यवर उपस्थित होते. पुणे येथील कॉसमॉस नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष सीए. मिलिंद काळे व उपाध्यक्ष सीए. यशवंत कासार यांनी अहमदनगर शहर सहकारी बँकेच्या नवीपेठ येथील मुख्य कार्यालयास नुकतीच भेट दिली. अहमदनगर जिल्हा नागरी सहकारी बँक्स् असोसिएशनचे अध्यक्ष तथा शहर बँकेचे चेअरमन सीए गिरीश घैसास यांनी सीए. मिलिंद काळे यांचा तसेच संचालक डॉ. विजयकुमार भंडारी यांनी सीए. यशवंत कासार यांचा आणि संचालक माणिकराव विधाते यांनी सीए. ज्ञानेश्वर काळे यांचा सन्मान केला.
यावेळी बोलताना शहर बँकेचे चेअरमन सीए गिरीश घैसास यांनी उपस्थितांचे स्वागत करुन नागरी सहकारी बँकांच्या दृष्टीने रिझर्व्ह बँकेच्या जाचक बाबी नमूद केल्या. त्याअंतर्गत सिक्युरिटायझेन अॅक्टनुसार जप्त करुन नॉन बँकिंग अॅसेट म्हणून एखादी मालमत्ता बँकेने रिझर्व प्राईजला खरेदी करुन कर्ज खाते बंद करुन घेताना कर्जावरील व्याज बँकांचे उत्पन्न म्हणून ग्राह्य न धरणे, पंजाब अॅण्ड महाराष्ट्र बँकेचे विलिनीकरण झाल्यानंतर युनिटी स्मॉल फायनान्सने पीएनसीपीएस व इक्विटी वॉरंट इश्यू केल्यानंतरही त्या गुंतवणुकीवर केलेली प्रोव्हीजन रिव्हर्स करण्यास परवानगी न देणे, एसएएफ मधील नागरी सहकारी बँकांना ठेवींचे व्याजदर स्टेट बँकेच्या ठेवींच्या व्याजदराप्रमाणे ठेवण्यास सांगणे यामुळे ठेवीदार नागरी सहकारी बँकेपेक्षा स्टेट बँकेकडे मुदत ठेव ठेवण्यास प्राधान्य देतील व पर्यायाने नागरी सहकारी बँकांना लिक्विडिटी रिस्कचा सामना करण्याची वेळ येऊ शकते. तसेच रिझर्व बँकेने पूर्वीची गृह कर्जाची मर्यादा रु.७० लाखावरुन वाढवून रु.१ कोटी ४० लाख केली आहे. परंतू अद्यापही प्रायॉरिटी सेक्टरला गृह कर्जाची मर्यादा रु. २५ लाख इतकीच ठेवलेली आहे. आणि नागरी सहकारी बँकांनी त्यांच्या एकूण कर्जाचे ५० टक्के कर्जे ही रु. २५ लाखापर्यंतच असावी असे निर्देश दिलेले आहेत, हे सुध्दा साध्य करणे कठीण आहे असे मुद्दे सीए गिरीश घैसास यांनी नॅशनलं को- ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशनचे उपाध्यक्ष सीए मिलिंद काळे यांच्यासमोर मांडले. या मुद्द्यांना अनुसरून सीए. मिलिंद काळे यांनी आपल्या मनोगतामध्ये संयुक्तरित्या पाठपुरावा करुन त्यांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न करु असे आश्वासन दिले.
तसेच पुढे त्यांनी आपल्या मनोगतामध्ये अहमदनगर शहर सहकारी बँकेच्या सध्याच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करुन सीए गिरीश घैसास आणि सर्व संचालक मंडळ यांनी कर्ज वसुलीच्या माध्यमातून थकीत कर्जाचे प्रमाण बऱ्याच अंशी कमी करण्यात यश मिळवले असून त्याबद्दल कॉसमॉस परिवाराच्या वतीने त्यांचे अभिनंदन केले. तसेच कॉसमॉस बँकेला भेट देण्याचे आवर्जून निमंत्रण दिले. यावेळी अहमदनगर शहर सहकारी बँकेचे ज्येष्ठ संचालक अशोक कानडे, डॉ. विजयकुमार भंडारी, प्रा. माणिकराव विधाते, प्रदीप कुमार जाधव, दत्तात्रय रासकोंडा, मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन चितळे, विशेष वसुली अधिकारी प्रकाश वैरागर, वरिष्ठ अधिकारी दिनेश लोखंडे, संजय मुळे तसेच बँकेचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles