अहमदनगर (प्रतिनिधी)- समाज घडविणार्या शिक्षकांचे प्रश्न शासनस्तरावर सुटणे आवश्यक आहे. शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबीत असून, सदर प्रश्न प्राधान्य क्रमाणे सोडविण्यासाठी शिक्षक परिषदेच्या माध्यमातून पाठपुरावा सुरु आहे. शिक्षकांनी देखील आपल्या हक्काप्रती जागृक राहून त्यांचे न्याय, हिताचे प्रश्न सोडविणार्या संघटनेबरोबर राहण्याचे आवाहन शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी केले.
क्रीडा शिक्षक भरत बिडवे यांची सेवा शिक्षण प्रसारक मंडळाचे कै. ना.ज. पाऊलबुधे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोडखे बोलत होते. याप्रसंगी जुनी पेन्शन कोअर कमिटीचे सचिव महेंद्र हिंगे, महादेव आम्ले, रोहिदास चौरे, रंगनाथ वाघ, विनायक सापा, विष्णु मगर, राजेंद्र मोरे, महेंद्र थिटे, पाखरे मामा, सौ. गावडे, नवले, बेंद्रे, केदार, नवले, वाघुले, वाळके, त्रंबके, दरे मॅडम, महादेव आमले, रोहिदास चौरे, रंगनाथ वाघ, विनायक सापा, विष्णु मगर, राजेंद्र मोरे, विराज बोडखे आदिंसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
पुढे बोलताना बोडखे म्हणाले की, माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या माध्यमातून सोसायटी व सभासद हिताचे कार्य संचालक म्हणून करीत आहे. सत्ताधारी संचालक मंडळावर अंकुश ठेवण्याचे काम परिवर्तन मंडळाच्या माध्यमातून प्रमाणिकपणे केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महेंद्र हिंगे यांनी भरत बिडवे 1991 पासून क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत आहे. त्यांच्या कामाची पावती म्हणून त्यांना प्राचार्यपदाची जबाबदारी मिळाली आहे. क्रीडा शिक्षक म्हणून काम करताना त्यांनी अनेक राष्ट्रीय खेळाडू घडविले. त्यांच्या विद्यार्थ्याला शिव छत्रपती पुरस्कार मिळण्याचा मान देखील मिळाला आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीन विकासासाठी त्यांचे कार्य दिशादर्शक राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजन मोरे यांनी केले. आभार महेंद्र थिटे यांनी मानले.