खा.सुजय विखेंच्या कार्यालयासमोर दवंडी धरणे आंदोलन.
आधुनिक लहुजी सेना विविध मागण्यासाठी आक्रमक
अहमदनगर प्रतिनिधी – काशिनाथ बोरगे
आधुनिक लहुजी सेनेच्या वतीने विविध मागण्यासाठी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या श्रीगोंदा शहरातील कार्यालयासमोर आधुनिक लहुजी सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,साहित्यरत्न जगत विख्यात साहित्यिक डॉ. अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा.मातंग समाजाला 13% आरक्षणांमधून वर्गवारी करून स्वतंत्र आरक्षण मिळावे.अण्णाभाऊ साठे महामंडळाला एन.एस.एफ.डी.सी. केंद्राची थेट कर्ज प्रकरणाची थेट योजना चालू व्हाव्यात तसेच कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण मधून मिळालेले जमिनीचे कर्ज प्रकरण माफ व्हावे.कर्ज वितरणासाठी राष्ट्रीयकृत महाराष्ट्र बँकेकडून होणारी अडवणूक थांबवण्यासाठी राष्ट्रीयकृत व सहकारी बँकेच्या शाखा अधिकाऱ्यांची सन्मयी बैठक करून लाभार्थ्याची बँकेमार्फत होणारी अडवणूक थांबवावी.शहीद झालेले संजय ताकतोडे यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करावे.बस स्थानकावर पोलीस कक्ष करण्यात यावा.श्रीगोंदा पोलीस स्टेशन मध्ये महिला सहाय्यक कक्ष व कुटुंब समुपदेशन केंद्र, भरवसा सेल चालू करावा.अण्णाभाऊ साठे यांचे मुंबई व वाटेगाव येथे दर्जेदार व ऐतिहासिक स्मारक व्हावे.पुणे येथे आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे स्मारक व्हावे.ग्रामीण व शहरी भागामध्ये अर्थ सहाय्य पुरवणाऱ्या खाजगी कंपन्या महिलांची आर्थिक पिळवणूक थांबवण्यात यावी.
यासह अन्य मागण्यांचे निवेदन आठ दिवसापूर्वी खासदार विखे यांच्या कार्यालया कडे देण्यात आले होते. त्यानंतरच खासदार साहेबांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आल्याची माहिती आधुनिक लहुजी सेनेचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे त्याचबरोबर महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष हिराताई गोरखे यांनी दिली.
या आंदोलनासाठी उपस्थित खादी ग्राम उद्योग चे माजी चेअरमन भगवान गोरखे, वसंतराव सकट, नंदू भाऊ ससाने, कांतीलाल कोकाटे, विजय शिंदे, गणेश शिंदे, माधव उल्हारे , किरण ससाने, युवराज ससाने , शंकर ससाने, भानुदास शिंदे, बापू शिंदे, छबु गोरखे, दत्तात्रय गोरखे, महादेव ससाने, दादा शिंदे, मीनाक्षी सकट, मोठ्या संख्येने महिला व समाज बांधव उपस्थित राहून आपले मनोगत व्यक्त केले.
खासदार सुजय दादा विखे यांच्या कार्यालयाकडून मागण्यांचा पाठपुरावा करू असे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर श्रीगोंद्याचे तहसीलदार यांनीही मागण्याचा पाठपुरावा सरकारकडे कळवण्याचे लेखी निवेदन दिल्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले.